परदेशी शिक्षणाची मात्रा भाग - ३: परदेशी विद्यापीठे तुमच्या दारी Rojgar News

परदेशी शिक्षणाची मात्रा भाग - ३: परदेशी विद्यापीठे तुमच्या दारी Rojgar News

प्रवीण मुळ्ये / नीरज पंडित मुंबई : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे गेल्या वर्षी खूप कमी होते. मात्र या विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी परदेशी विद्यापीठांनी अनेक ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर मोफत तर अल्प शुल्कात काही प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे गेल्यावर्षभरात या अभ्यासक्रमांच्या मागणीत ६७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे एका पाहणीत समोर आले आहे. करोनामुळे गतवर्षी अनेक देशांच्या सीमा बंद होत्या. यामुळे मार्चमध्ये विद्यार्थ्यांना परदेशात जाता आले नाही. पण नोव्हेंबरनंतर काही प्रमाणात सीमा खुल्या झाल्यामुळे काही विद्यार्थी परदेशात गेले. यात राज्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक २० टक्के होते. परंतु तरीही जाऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त होते. या विद्यार्थ्यांचा विद्यापीठाशी संपर्क तुटू नये म्हणून विद्यापीठांना त्यांना अनेक ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले होते. यामुळे परदेशी जाण्यास इच्छुक विद्यार्थी याचबरोबर केवळ पैशांअभावी या शिक्षणाला मुकणारे अनेक विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा ऑनलाइन शिक्षणाकडे वळविला. इतरवेळी हजारो रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रम यंदा मोफत उपलब्ध झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेत प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. मोफत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि इंटर्नशिप सध्या विद्यार्थी घरून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. या अभ्यासक्रमांना पुरक असे ऑनलाइन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, इंटर्नशिप परदेशातील प्रमुख विद्यापीठे घेऊन आली आहेत. इतरवेळी हजारो रुपये खर्च करुन परदेशात जाऊन करावे लागणारे हे अभ्यासक्रम चक्क मोफत उपलब्ध होत आहेत. त्यामुळे आपले प्रोफाइल अधिक भक्कम करण्यासाठी पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही गटातील विद्यार्थी या अभ्यासक्रमांना पसंती देत आहेत. विद्यार्थ्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा परदेशी विद्यापीठांच्या या पद्धतीमुळे देशातील विद्यापीठांपुढेही मोठे आव्हान निर्माण केले असल्याचे परदेशी अभ्याक्रम विषयक तज्ज्ञ सुचित्रा सुर्वे यांनी सांगितले. अभ्यासक्रमांचे असेही अर्थशास्त्र पूर्ण अभ्यासक्रम परदेशात जाऊन पूर्ण करणे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे यावरही परदेशी विद्यापीठांनी यंदा पहिल्यांदाच नवीन पर्यायही समोर आणले आहेत. अभ्यासक्रमाचा काही भाग ऑनलाइन पद्धतीने भारतात राहून पूर्ण करणे आणि उर्वरित अभ्यासक्रम परदेशात प्रत्यक्ष विद्यापीठात पूर्ण करण्याचा पर्याय काही विद्यापीठांनी दिला आहे. तशी छोटी मॉड्युल्सही आखण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांच्या मनात अभ्यासक्रमांबाबत संभ्रम असल्यास ठरावीक कालमर्यादेत संपूर्ण शुल्क परत करण्याचा पर्यायही अनेक खासगी विद्यापीठे देत आहेत. अनेक विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. परंतु काही कारणास्तव व्हिसा रद्द झाल्यासही पूर्ण फी परतावा करण्याचे धोरण युरोप, अमेरिकेतील अनेक विद्यापीठांनी यंदा प्रथमच स्वीकारले आहे असे करिअर मार्गदर्शक स्वाती सांळुखे यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणावर शिष्यवृत्ती परदेशी विद्यापीठांबरोबरच भारतीय खाजगी वित्त संस्थांनीही परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच कोटी रुपयांपर्यंतच्या शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. ऑनलाइन शिक्षण व्यासपीठ लेव्हरेज एडू स्कॉलरशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण शुल्क कमी करण्यापासून ते कॅम्पस खर्चाचाही समावेश करण्यात आला आहे. जगभरातील विद्यार्थी, पालक आणि शैक्षणिक संस्थांसमोर २०२० या वर्षाने अनेक आ‌व्हाने उभी केली. आर्थिक बाजारही थंडावला होता. त्यामुळे मागील वर्षात तत्पारतेने विद्यार्थ्यांना भांडवल पुरवण्यासाठीही आम्हाला मर्यादा जाणवल्याचे प्रोडिगी फायनान्सचे मयांक शर्मा यांनी सांगितले. २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय सीमा हळूहळू खुल्या होत आहेत. लसीकरण मोहीम पाहता पुढील तिमाहीत कॅम्पस शिक्षणाबाबत आणखी आशादायक चित्र आहे. त्यामुळे २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये ३०-३५ टक्के वृद्धीची अपेक्षा करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wOrtss
via nmkadda

0 Response to "परदेशी शिक्षणाची मात्रा भाग - ३: परदेशी विद्यापीठे तुमच्या दारी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel