शिक्षण विभागाच्या परफॉर्मन्स ग्रेडींग इंडेक्समध्ये ५ राज्य अव्वल Rojgar News

शिक्षण विभागाच्या परफॉर्मन्स ग्रेडींग इंडेक्समध्ये ५ राज्य अव्वल Rojgar News

: केंद्रीय शिक्षण विभागाने रविवारी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (PGI) जाहीर केली आहे. यामध्ये पाच राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचा समावेश आहे. पंजाब, चंदीगड, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटे आणि केरळ या राज्यांचा ए ++ या उच्च श्रेणीमध्ये समावेश झाला आहे. ग्रेडींग इंडेक्स ही राज्यांतील शिक्षणाच्या कामगिरीचे ७० मापदंड लावून विश्लेषण करते. यानुसार ग्रेडिंग इंडेक्सने दिल्ली, गुजरात, हरियाणा, राजस्थान, पुडुचेरी, दादरा आणि नगर हवेलीला ए + प्रकारात समाविष्ट केले आहे. पंजाबने शासन आणि व्यवस्थापनमध्ये यामध्ये जास्त गुण मिळवले आहेत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत बिहार आणि मेघालय यांनी सर्वात कमी गुण मिळवले आहेत. अंदमान आणि निकोबार बेटे आणि ओडिशा यांनी पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात २०१९-२० ते २०१८-१९ दरम्यान लक्षणीय सुधारणा केल्या आहेत. राज्य व केंद्रशासित प्रदेशांनी त्यांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यास सुरवात केली असल्याचे यात दिसून येते. गव्हर्नन्स प्रक्रियेत १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी १० टक्क्यांनी किंवा त्याहून अधिक सुधारणा दाखवली आहे. अंदमान निकोबार बेटे, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये कमीतकमी २० टक्क्यांनी सुधारणेत वाढ झाली आहे. शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्रशासकीय कर्मचार्‍यांची कमतरता, नियमित देखरेखीची व तपासणीची कमतरता, शिक्षकांचे अयोग्य प्रशिक्षण, वेळेवर आर्थिक निधी उपलब्ध नसणे (शासन आणि व्यवस्थापन क्षेत्रात ) या बाबींना शिक्षणसंस्थांना सामोरे जावे लागते हे यादरम्यान अहवालातून निदर्शनास आले. पीजीआयच्या माध्यमातून, उणिवा, वस्तुस्थिती आणि नियमन मोजले जाते. ही तफावत दूर करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलणे आवश्यक आहे, असेही त्यात नमूद केले आहे. निर्देशांकानुसार, बहुतेक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी पूर्वीच्या वर्षांच्या तुलनेत पीजीआय २०१९-२० मध्ये श्रेणी सुधारली आहे.अंदमान निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, पुडुचेरी, पंजाब आणि तामिळनाडू यांनी पीजीआयच्या एकूण गुणांमध्ये दहा टक्क्यांनी वाढ केली आहे. अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि ओडिशा क्षेत्रात १० टक्क्यांहून अधिक सुधारणा दिसून आल्या आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ghtQgr
via nmkadda

0 Response to "शिक्षण विभागाच्या परफॉर्मन्स ग्रेडींग इंडेक्समध्ये ५ राज्य अव्वल Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel