TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

नॉन प्रोफेशनल कोर्स प्रवेश कधी सुरु होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती Rojgar News

Non-Professional Courses: राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी नॉन प्रोफेशनल कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रीयेसंदर्भात घोषणा केली. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. बारावीच्या निकालानंतर ही प्रक्रिया सुरु होणार आहे. नॉन-प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रवेशासाठी सीईटीचे आयोजन करणे किंवा बारावी गुणांच्या आधारे प्रवेश प्रक्रिया घेण्याचा पर्याय होता. बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. निकाल लागल्यानंतर आम्ही सीईटी घ्यायची की नाही? यावर निर्णय घेऊ असे उदय सामंत म्हणाले. तसेच उदय सामंत यांनी यावेळी महाविद्यालयातील भरती प्रक्रियेसंदर्भात शिक्षक संघटनांसोबत संवाद साधला. राज्य सरकारने एकूण ४,०७४ पद भरण्याचा निर्णय घेतला आहे. १,६०० पदांसाठी प्रक्रिया पूर्ण आधीच पूर्ण झाली असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. करोनामुळे उरलेल्या पदांची प्रक्रीया थांबवली गेली. पण फाईल्सवर कारवाई केली गेली. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या मंजुरीनंतर लवकरच सरकारी प्रस्ताव जाहीर केला जाईल असे सामंत म्हणाले. ७०० ते ७५० रिक्त पदांची संपूर्ण प्रक्रिया सुरु झाली आहे. २०२० पर्यंत रिक्त शिक्षण पदांसाठी सर्व्हेक्षण केले जाणार आहे. पदवी कार्यक्रमांमध्ये शिक्षकांचे काम प्रति तासाप्रमाणे असणार आहे. प्रॅक्टीकलसाठी प्रति तास ५०० रुपयांपासून ६१५ रुपये आणि १५० ते २५० रुपयांपर्यंत वाढवले गेले. पदव्युत्तर कोर्सेससाठी (पीजी) शिक्षकांना प्रतितास ६०० रुपयांनी वाढवून ७५० करण्यात आले आहे. तर प्रॅक्टीकल करणाऱ्यांसाठी २५० रुपयांऐवजी ३०० रुपये दिले जातील. तसेच सरकारतर्फे लवकरच लायब्ररी अध्यक्षची १२१ पदं भरली जाणार असल्याचे सामंत म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3A8C2ZB
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या