Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २३ जून, २०२१, जून २३, २०२१ WIB
Last Updated 2021-06-23T12:47:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

प्रेझेंटेशन असो किंवा भाषण, वक्तृत्व कौशल्याने असा बना प्रभावी वक्ता Rojgar News

Advertisement
Public Speaking Tips:भले तुमचे स्पीच चांगले लिहिले असो किंवा नसो पण समोऱ खूप माणसं बघून नर्व्हस व्हायला होतं. अशाने आत्मविश्वास देखील कमी होतो आणि आपण आपले मुद्दे विसरुन जातो. पब्लिक स्पिकिंगवेळी आपल्या समोरच्यांशी संवाद साधायचा असतो. आणि सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचे असते. आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही सहज द्याल आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. मुद्दे थोडक्यात लिहा तुमची सुरुवातीची वाक्य प्रभावी असतील तर लोकांना पूर्ण भाषण ऐकायला आवडेल. त्यामुळे खूप महत्वाचे मुद्दे पॉईंटनुसार लिहा. त्याचा सारांश बनवा. आपण स्वत: लिहीतो ते विसरत नाही. त्यामुळे मुद्देसूद बोललात तर तुमचा आत्मविश्वास वाढेल. खूप सराव तुम्ही जितका जास्त सराव कराल तितके प्रभावी भाषण देऊ शकाल. त्यामुळे भाषण देताना ऐनवेळी चुका करण्यापेक्षा आधीच खूप सराव करुन मंचावर या. त्यावेळी सरावादरम्यान तुमच्या अनेक शंका दूर झालेल्या असतील. भाषेवर लक्ष द्या. लोकांना समजेल अशाच भाषेत बोला. मध्येच प्रश्न देखील विचारा त्यामुळे लोक देखील कनेक्ट होतील. भाषण देण्याआधी आरशासमोर उभे राहून सराव करा. आपले भाषण पाहा पब्लिक स्पीच देत असाल तेव्हा स्वत:ला पाहू शकत नाही. पण कॅमेराच्या मदतीने ते रेकॉर्ड करुन नंतर पाहू शकता. यामुळे तुम्हाला तुमचे चेहऱ्याचे हावभाव, हातवारे, पॉझ समजेल. दुसऱ्या भाषणावेळी यातील चुका तूम्ही सुधारु शकता. स्मितहास्याने वाढेल आत्मविश्वास पब्लिक स्पीचवेळी स्ट्रेस आणि लो फील करणं सर्वसामान्य बाब असू शकते. पण यातून वाचण्यासाठी एक मार्ग आहे. तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असते तेव्हा प्रेक्षक आनंदी असतात. आणि ऐकण्यात स्वारस्य दाखवतात. तुम्ही गंभीर असता तेव्हा निगेटीव्ह इम्पॅक्ट पडतो. त्यामुळे चांगली स्पीच खराब होऊ देऊ नका. प्रेक्षकांना सहभागी करा तुमचे भाषण एकतर्फी होणार नाही याची काळजी घ्या. प्रेक्षकांना देखील तुमच्या भाषणात सहभागी करुन घ्या. तुम्ही एखादा पॉईंट स्पष्ट केला तर प्रेक्षकांना त्याबद्दल प्रश्न नक्की विचारा. प्रेक्षकांना काय ऐकायचंय हे यातून तुम्हाला लक्षात येईल. निष्कर्ष काढा तुम्ही कोणत्या समस्येबद्दल बोलत असाल तर त्या समस्येतून मार्ग कसा काढावा याबद्दल बोलू शकता. प्रॅक्टीकल आणि खऱ्या टीप्स सांगून प्रेक्षकांना निष्कर्षापर्यंत न्या. यामुळे तुमच्या भाषणातील रुची कायम राहील. हे सर्व झाल्यानंतर प्रेक्षकांना फिडबॅक नक्की विचारा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qiF498
via nmkadda