दहावीच्या निकालास मुदतवाढ देण्याची मागणी Rojgar News

दहावीच्या निकालास मुदतवाढ देण्याची मागणी Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई शाळांनी इयत्ता दहावीचा निकाल () राज्य शिक्षण मंडळाकडे सादर करण्याची तारीख जवळ येत आहे. मात्र शिक्षकांना अद्याप लोकल प्रवासाची मुभा मिळालेली नाही. याचबरोबर इयत्ता नववीच्या निकालाच्या सूत्रात बसवण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने गुण सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल वेळेत लावण्यासाठी सोपवण्यात आलेल्या कामकाजासाठी राज्यातील शिक्षक आणि मुख्याध्यापकांकडे केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला आहे. या उरलेल्या दिवसांत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे गुण, त्यासाठी मंडळाकडून आलेले संपूर्ण नियोजन पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी शिक्षकांनी त्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार कामकाज सुरू ठेवले आहे. मात्र अनेक तांत्रिक अडचणींचा सामना यासाठी करावा लागत आहे. यातच शिक्षकांना लोकल प्रवासास मुभा मिळलेली नाही. यामुळे काम करण्यासाठी शाळेत शिक्षक पाहोचू शकत नाहीत. याचबरोबर ज्या पोर्टलवर गुण अद्ययावत करायचे आहे तेही २३ तारखेनंतर खुले होईल, असे सांगण्यात येत आहे. सूत्रात गुण बसवण्याची कसरत दरम्यान, शाळांनी त्यांच्या स्तरावर गुणांचे विभाजन करून सूत्रांमध्ये बसवण्याचे काम सुरू केले आहे. परंतु, मनुष्यबळाचा अभाव, याच काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणे या सर्वांत वेळ जात असल्याने शिक्षकांना निकालाचे काम वेळेत पूर्ण होईल की नाही, अशी शंका वाटत आहे. काही शाळांमध्ये तर काही विद्यार्थ्यांनी एकही सराव परीक्षा दिली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे त्या विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क साधून त्यांना सराव परीक्षा देण्यास सांगितले जात आहे. यानंतर त्यांचा निकाल तयार करण्यात येणार आहे. परिणामी या सर्व बाबींचा विचार करता निकालाच्या कामासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिक्षक मुख्याध्यापकांकडे करत आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j5xwVJ
via nmkadda

0 Response to "दहावीच्या निकालास मुदतवाढ देण्याची मागणी Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel