Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ३ जून, २०२१, जून ०३, २०२१ WIB
Last Updated 2021-06-03T04:47:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

नागपूर एम्समध्ये वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे भरती Rojgar News

Advertisement
AIIMS Recruitment 2021: वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या उमेदवारांना एम्समध्ये नोकरी करण्याची (Medical Jobs) सुवर्णसंधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) पगार मिळणार आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) नागपूर मध्ये अॅनेस्थिसियोलॉजी, जनरल मेडिसिन, मायक्रोबायोलॉजी आणि अन्य विविध विभागांमध्ये सीनियर रेसिडंट पदांवर भरतीसाठी वॉक-इन-इंटरव्ह्यूचे नोटिफिकेशन जारी केले आहे. एम्स नागपूर सीनियर रेसिडंट भरती 2021 साठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार १० जून २०२१ रोजी वॉक-इन-इंटरव्ह्यू मध्ये सहभागी होऊ शकतात. एम्स भरती 2021 () शी संबंधित माहिती, पदांची संख्या, विभाग, शैक्षणिक योग्यता, वेतन आदि माहिती पुढे देण्यात आली आहे. अर्ज करण्याआधी पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंक वर भेट देता येईल. पदांची माहिती (AIIMS Vacancy 2021 Details) अॅनेस्थिसियोलॉजी - ०४ पदे जनरल मेडिसीन - ०५ पदे मायक्रोबायोलॉजी -०१ पद ऑर्थोपेडिक्स - ०१ पद पीडियाट्रिक्स - ०३ पदे पल्मोनरी मेडिसीन - ०४ पदे रेडियोडायग्नोसिस - ०२ पदे एकूण पदांची संख्या - २० पदे पात्रता काय? कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या व्यतिरिक्त डीएमसी किंवा डीडीसी किंवा एमसीआय किंवा राज्यातील नोंदणी आवश्यक आहे. वेतन आणि भत्ते एम्स नागपूर सीनियर रेसिडंट भरती 2021 अधिसूचनेनुसार, सीनियर रेसिडंट पदासाठी नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगाच्या श्रेणी ११ नुसार ६७,७०० रुपये वेतन आणि लागू होणाऱ्या भत्त्यांचा लाभ दिला जाईल. अर्ज कसा करायचा? इच्छुक आणि योग्य उमेदवार १० जून २०२१ रोजी आयोजित वॉक-इन-इंटरव्ह्यू मध्ये उपस्थित राहू शकतात. कॉन्फ्रन्स हॉल, पहिला मजला, ओपीडी बिल्डिंग, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर - ४४११०८ येथे या मुलाखती आयोजित केल्या जाणार आहेत. योग्य उमेदवार आपल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत आणि फोटोकॉपी यांचा एकेक सेट सोबत आणायचा आहे. भरतीविषयी अधिक माहितीसाठी पुढील नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Rfl22g
via nmkadda