Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ७ जून, २०२१, जून ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-06-07T07:47:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

जम्मूच्या लहान मुलीची शाळेबद्दल पंतप्रधान मोदींकडे तक्रार Rojgar News

Advertisement
Complaint : कश्मीरची ६ वर्षाची मुलगी मैरु इरफानने होमवर्क संदर्भात यांच्याकडे तक्रार केली होती. अखनूरच्या गुढा ब्राम्हणा येथील आठवीत शिकणाऱ्या तानिया शर्माने शाळेची तक्रार केली आहे. मला आणि माझ्या चौथीत शिकणाऱ्या बहिणीला शाळेतून जबरदस्ती बाहेर काढण्यात आले आणि आमचे ट्रान्स्फर सर्टीफिकेट रद्द करण्यात आले असे तिने म्हटले आहे. सोशल मीडियामध्ये तानियाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तानिया आणि तिची बहीण फैज पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल, गुढा ब्राम्हणामध्ये शिक्षण घेत आहेत. तिचे वडील तरसेम लाल हे मजदूरी करतात. शाळा सोडण्यासंदर्भात तिने कोणताही अर्ज केला नव्हता. पण शाळेने त्यांची टीसी रद्द केली. आम्ही त्याला विरोध केला पण शाळा मनमानी करत असल्याचे तिचे म्हणणे आहे. शाळेवर विश्वासघाताची कारवाई करावी अशी मागणी तिने केली. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्याकडे तिने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. सरकार बेटी बचाव, बेटी पढावचा नारा देते पण असे सुरु राहीले तर मुलींनी शिकायचे कसे ? असा प्रश्न तिने तक्रारीत विचारला आहे. काश्मीरच्या मुलीनंतर जम्मूच्या मुलीचा आवाज देखील सरकार ऐकणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T75tdr
via nmkadda