परदेशी शिकायला जायचंय? Rojgar News

परदेशी शिकायला जायचंय? Rojgar News

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर कोविड-१९चा प्रत्येकावर परिणाम झाला आहे. सध्याची परिस्थिती पाहता बऱ्याच विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रावर परिणाम झालेल्या आव्हानांचा सामना कसा करावा असा प्रश्न पडला आहे. या परिस्थितीत परदेशी अभ्यास करण्याची संधी गमावू नये, म्हणून विद्यार्थी लोकप्रिय नसलेली विद्यापीठं, महाविद्यालयं आणि राज्य (state) विद्यापीठांमध्येही अर्ज करत आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी स्थगितीचा (deferment) पर्याय निवडला आहे. ० सर्व अनिश्चिततेसह आतापर्यंत घडलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू या... - नवीन प्रवेश निकष- बऱ्याच विद्यापीठांनी जीआरई (GRE) व जीमॅटचे (GMAT) गुण माफ केले आणि इंग्रजी प्राविण्यता (IELTS/TOEFL/PTE) कशी सबमिट करावी यासाठी पर्याय दिले आहेत. उदाहरणार्थ, ड्युओलिंगो (duolingo) चाचणी (बऱ्याच संस्थांद्वारे मान्यताप्राप्त) घरातून घेतली जाऊ शकते आणि नवीन चाचणी घेणारी रचना समजून घेण्यासाठी चाचणी करू शकतात. ही चाचणी कुठे स्वीकारली जाते, हे पाहण्यासाठी कृपया वेबसाइट पाहा. - प्रवेश अर्जाची प्रक्रिया व अंतिम मुदत- विद्यापीठांनी अर्ज आणि कागदपत्रं सादर करण्याची मुदत वाढवली आहे. त्यांनी ऑनलाइन/स्कॅन केलेली पदवी प्रमाणपत्रंदेखील स्वीकारण्यास सुरूवात केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्र सादर करणं आणि प्रक्रिया पूर्ण करणं शक्य होतं. वास्तविक, अंतिम मुदतीपूर्वी अर्ज सादर करणं आणि कागदपत्र सबमिशनसाठी वेळ राखून ठेवणं हे नेहमीच चांगलं. आपण पात्रतेचे निकष किंवा अंतिम मुदत पूर्ण करू शकणार नाही, असं वाटत असल्यास कृपया प्रवेश कार्यालयात (admission office) ई-मेलद्वारे संपर्क साधा. - ऑनलाइन लर्निंग- कॅम्पसमधील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी बहुतेक विद्यापीठं ऑनलाइन वर्ग घेऊ लागली आहेत. विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन होण्यासाठी आणि स्पष्टीकरण मिळण्यासाठी विद्यापीठाद्वारे व्हर्च्युअल कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. जर विद्यार्थी वर्गात येऊ शकले नाहीत तर विद्यार्थ्यांच्या हितासाठी पूर्व रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. - विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास मदत करण्यासाठी व नवीन क्षेत्रांची माहिती देण्यासाठी युनिव्हर्सिटीज मॉड्यूल व सत्रांमध्ये काही बदल करु शकतात. यात नवनवीन तंत्रज्ञानाचा समावेश होतो. परदेशातील काही विद्यापीठांनीही ब्लेंडेड लर्निंग म्हणजेच पारंपरिक वर्ग पद्धतींसह ऑनलाइन शैक्षणिक साहित्य ही संकल्पना स्वीकारली आहे. पुढे जाणं महत्त्वाचं आहे आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणं किंवा बदलणं हा मुख्य मुद्दा आहे. प्रतिक्षा करणं आणि पुढे काय केलं जाऊ शकतं याबद्दल माहिती एकत्रित करून स्वत:ला अपग्रेड करणं हे सर्व विद्यार्थी करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pgqA9d
via nmkadda

0 Response to "परदेशी शिकायला जायचंय? Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel