राज्यातल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय लांबला; प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे Rojgar News

राज्यातल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय लांबला; प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे Rojgar News

2021 cancelled: सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर राज्यातल्या बारावीच्या परीक्षांचे काय असा प्रश्न उपस्थित होत होता. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षेसंदर्भातील (HSC Exam 2021) निर्णय राज्य सरकार येत्या एक-दोन दिवसात जाहीर करणार आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.मंत्रिमंडळ बैठकीत बारावीची परीक्षा रद्द करण्यावर एकमत झाले आहे. मात्र हा प्रस्ताव राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. करोना काळात परीक्षा घेणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही, अशी राज्य सरकारची पूर्वीपासूनचीच भूमिका होती. तसेच या प्रस्तावात नमूद असल्याचे संकेत केंद्राचे मोठे पाऊल दरम्यान, करोना साथीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मंगळवारी घेतला. पंतप्रधान कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांचे हित ध्यानात ठेऊनच घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांची सुरक्षा सर्वांत महत्त्वपूर्ण असून त्याबाबत तडजोड केली जाऊ शकत नाही. बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे आवश्यक होते. सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीत विद्यार्थ्यांवर परीक्षा देण्यासाठी दबाव टाकणे योग्य नाही.’ बारावीच्या परीक्षेसंदर्भात अंमलात आणलेल्या सल्लामसलत प्रक्रियेचे पंतप्रधानांनी कौतुक केले. या विषयावर आपापली मते व्यक्त केल्याबद्दल त्यांनी राज्यांचे आभारही मानले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vLDGhc
via nmkadda

0 Response to "राज्यातल्या बारावीच्या परीक्षेसंदर्भातील निर्णय लांबला; प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel