सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश Rojgar News

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश Rojgar News

वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास १ जुलैपासून सुरूवात होणार असून या सत्रातील प्रवेशासाठीची अंतिम तारीख वाढवून आता ३० जूनपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टिकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थीना वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येते. त्या अनुषंगाने सन २०२१-२२ या चालू वर्षातील, १ जुलै २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या सहा महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. यासाठी, प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण ४५० रूपये तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा १०० रूपये एवढे आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी विहित अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली,वर्सोवा, मुंबई - ६१ येथे दिनांक ३० जून २०२१ पर्यत सादर करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j48t5q
via nmkadda

0 Response to "सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel