एमपीएससी परीक्षांच्या निकालाबाबत काय निर्णय ? जाणून घ्या Rojgar News

एमपीएससी परीक्षांच्या निकालाबाबत काय निर्णय ? जाणून घ्या Rojgar News

exams Result going to change : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एमपीएससीच्या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वच परीक्षांचा बदलण्याची शक्यता आहे. एमपीएससीने रखडलेल्या परीक्षा प्रक्रियेबाबत राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागितले होते. मार्गदर्शक सूचनेनंतर एमपीएससीने कार्यवाही सुरु केली आहे. त्यानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गातील उमेदवारांना खुल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्ल्यूएस) मधून संधी मिळणार आहे. परीक्षांच्या निकालावर याचा मोठा परिणाम पाहायला मिळू शकतो. मार्गदर्शक सुचनांनुसार सर्वच परीक्षांचा निकाल बदलणार असून पात्र उमेदवार अपात्र ठरण्याची शक्यता आहे. याविषयावर उद्या ७ जून रोजी आयोगाची महत्वाची मिटींग होणार आहे. या मिटींगमध्ये काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 'एसईबीसी'चे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर 'एमपीएससी'च्या २४ प्रकारच्या परीक्षांचे निकाल, मुलाखती, नियुक्‍त्या रखडल्या होत्या. मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांचे आरक्षण रद्द झाल्यानंतर या उमेदवारांच्या संधीसंदर्भात प्रश्न उपस्थित राहीला. यासंदर्भात राज्य सरकारतर्फे आयोगाला मार्गदर्शन पाठवण्यात आले आहे. यानुसार मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना खुल्या आणि ईडब्ल्यूएसमधून संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याचा परिणाम झालेल्या पूर्व, मुख्य परीक्षांच्या निकालावर दिसू शकतो. राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना मुख्य परीक्षेला पात्र ठरविण्यापूर्वी पूर्व परीक्षेचा निकाल बदलण्याची शक्यता आहे. मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखतींपूर्वी पुन्हा नव्याने निवड यादी तयार होणार आहे. त्यामुळे मुख्य परीक्षा होऊन उत्तीर्ण झालेल्यांना बाहेर जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच मुलाखती झालेल्यांपैकी देखील काहीजण अपात्र ठरण्याची शक्यता आहे. संयुक्‍त पूर्व परीक्षेपूर्वी 'एसईबीसी'तील उमेदवार ईडब्ल्यूएस की खुल्या प्रवर्गातून परीक्षा देणार यासाठी पर्याय भरुन घेतले जात असून आठ ते दहा दिवसांची मुदत दिली जाणार आहे. यानंतर राज्य व्यवस्थापन विभागाच्या परवानगीनंतर सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3cl6m9o
via nmkadda

0 Response to "एमपीएससी परीक्षांच्या निकालाबाबत काय निर्णय ? जाणून घ्या Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel