उद्योग निरीक्षकांची भरती 'एमपीएससी'द्वारे Rojgar News

उद्योग निरीक्षकांची भरती 'एमपीएससी'द्वारे Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, मुंबई राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या उद्योग निरीक्षक या गट क संवर्गातील पदाची भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील संबंधित उमेदवारांना होणार आहे. राज्य सरकारच्या विविध विभागांतील सरळसेवा भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत व्हावी, अशी मागणी होत होती. आता महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे त्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होईल. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाकडील उद्योग संचालनालय व क्षेत्रीय कार्यालयातील उद्योग निरीक्षक (गट क, अराजपत्रित) या पदाची निवड यापूर्वी जिल्हा निवड समितीकडून केली जात होती. तथापी ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे करण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x0htMy
via nmkadda

0 Response to "उद्योग निरीक्षकांची भरती 'एमपीएससी'द्वारे Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel