पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र Rojgar News

पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र Rojgar News

म. टा. प्रतिनिधी, पुणे करोनाच्या प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले ाचा पदवी प्रदान समारंभ होत नसल्याने, परदेशात उच्चशिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्याना पदवी प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे विद्यापीठाने परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 'प्रोव्हिजनल' पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमाणपत्राबाबत विद्यापीठाकडे संपर्क करणाऱ्या साधारणतः पाच हजार विद्यार्थ्यांना यामुळे तात्पुरत्या स्वरूपात प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी परदेशात जातात. या विद्यार्थ्यांना परदेशातील संबंधित विद्यापीठाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. त्याचप्रमाणे पदवीचे प्रमाणपत्र, ट्रान्स्क्रिप्ट प्रमाणपत्र, गुणपत्रिका अशा शैक्षणिक प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. गेल्या वर्षभरापासून राज्यात करोनाचा प्रादुर्भाव आहे. अशा परिस्थितीत २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी पदवीप्रदान समारंभाचे आयोजन होऊ शकलेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अजूनही पदवी प्रमाणपत्र मिळू शकलेले नाही. प्रमाणपत्रासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी पदवी प्रमाणपत्राबाबत विद्यापीठाकडे विचारणा केली होती. मात्र, पदवी प्रदान समारंभ होऊ न शकल्याने या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याबाबत विद्यापीठापुढेदेखील प्रश्न निर्माण झाला होता. अखेर कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी कुलपती कार्यालयातून विशेष परवानगी मिळवून या विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठात प्रवेश घेण्याची अडचण दूर होणार आहे. करोनाचा प्रादुर्भाव दूर झाल्यानंतर पदवी प्रदान समारंभात या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पदवी प्रदान समारंभासाठी साधारण एक लाख ६४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, पदवी प्रमाणपत्र मिळण्यासाठी विद्यार्थ्यानी आणि त्यांच्या पालकांनी सोशल मीडियावर ट्विट केले आहेत. परदेशात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने परीक्षा मंडळाची बैठक घेतली. प्रमाणपत्राची तातडीने आवश्यकता असणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. पाच हजार विद्यार्थ्यांना प्रोव्हिजनल प्रमाणपत्र देण्यात येणार असून, यासाठी त्यांनी पाठविलेल्या ई-मेलचा किंवा अर्जांचा आधार घेण्यात येईल. - डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SQxQwx
via nmkadda

0 Response to "पुणे विद्यापीठ देणार परदेशी शिक्षणासाठी प्रोव्हिजनल पदवी प्रमाणपत्र Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel