Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ५ जून, २०२१, जून ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-05T13:47:41Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

मुंबई विद्यापीठात दोन नविन जैवविवधता उद्याने Rojgar News

Advertisement
घाणेरी, जास्वंत, मोगरा, कणेर, टगर, जमाईकन स्पाईक, लिंबू, गाल्पेनिआ, अबोली, पेव, कृष्णकमळ, पेंटास, हॅमेलिया, इक्झोरा, सोनचाफा अर्जून, तूती आणि कोलियस अशा विविध प्रजातींची सुगंधी आणि शोभेच्या रोपांची लागवड शनिवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या मरीन ड्राईव्ह आणि कलिना कॅम्पसमध्ये करण्यात आली. दोन्ही परिसरात सुमारे एक हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. मरिन ड्राईव्ह येथील सुमारे चार हजार चौरसफूट आणि कलिना कँपस येथील पाच हजार चौरसफूट जागेवर एक ते दीड महिन्यांच्या कालावधीत दोन्ही परिसरात फुलपाखरू उद्याने तयार होतील. प्रोजेक्ट मुंबई व मेकिंग द डिफरंस या सेवाभावी संस्थांनी या दोन्ही उद्यानांसाठी रोपे पुरवलेली आहेत. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते कलिना कँपस येथे तर मरीन ड्राईव्ह कँपस येथे प्र. कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. आयुर्वेद आणि वनस्पती शास्त्राच्या विद्यार्थ्यांना तसेच संशोधकांना अभ्यासासाठी उपयोगी पडतील अशी विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली असून, या सर्वांत निसर्गाच्या रंगांची मूक्त उधळण होण्यासाठी फूलपाखरांची उद्यानेही तयार करीत असल्याचे प्र. कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण या दोन्ही विभागाने याकामी महत्वाची भूमिका निभावली. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर म्हणाले, 'मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट आणि विद्यानगरी परिसरात अनेक दूर्मिळ प्रजातीची वृक्ष आणि ऋतुमानाप्रमाणे बहरणारी फुलझाडे आहेत. या जैवविविधतेचे परीक्षणाचे काम हाती घेण्यात आले, जिओ टॅगिंग आणि क्यूआर कोडच्या माध्यमातून इत्यंभूत माहिती उपलब्ध करून देण्याच्या प्रकल्पालाही सुरुवात करण्यात आली आहे. आपली वसुंधरा अधिकाधीक सुंदर होण्यासाठी व तीचे सरंक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करणे गरजेचे आहे.'


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TEgwLv
via nmkadda