Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २५ जून, २०२१, जून २५, २०२१ WIB
Last Updated 2021-06-25T10:47:04Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

११ वी सीईटी परीक्षेत मराठीचा पर्याय हवा, मनसेची मागणी Rojgar News

Advertisement
11th CET exam: करोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अकरावी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला. अकरावीसाठी सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणार आहे. दरम्यान यासाठी चार विषयांची परीक्षा होणार आहे. या परीक्षेत मराठी भाषेचा पर्याय असावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेत इंग्रजी, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील. ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपात घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी (Multiple Choice Objective Type Question)स्वरुपाचे असणार आहे. यामध्ये मराठी भाषेच्या पर्यायाची मनसेने मागणी केली आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे. शैक्षणिक प्राथमिक भाषा देखील मराठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य महत्वाचे नाही का?, राज्य सरकारला त्याची काळजी नाही का? असा प्रश्न मनसेने उपस्थित केलाय. राज्य सरकारने तातडीने शासन निर्णयात बदल करुन अकरावी सीईटीसाठी उपलब्ध करुन द्यावा. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे. पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहिले आहे. या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. आणि परीक्षेचा कालावधी २ तासांचा असणार आहे. परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ/परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल. ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे ऐच्छिक असणार आहे. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी पोर्टलवर परीक्षेला बसायचे की नाही यासाठी पर्याय उपलब्ध करुन दिला जाणार आहे. दहावीचा निकाल १५ जुलै दरम्यान लागण्याची शक्यता आहे. निकालानंतर २ आठवड्यात म्हणजे जुलै महिन्याच्या अखेरिस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस अकरावी CET परीक्षा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु करावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राज्य सरकार मनसेची ही मागणी ऐकून घेणार का ? हे पाहणे महत्वाचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qtmZFI
via nmkadda