Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, ८ जून, २०२१, जून ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-06-08T05:47:52Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बारावीनंतर सीईटी? शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती Rojgar News

Advertisement
: करोनाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द (12th std Exam Cancelled) करण्यात आल्या. त्यानंतर आता या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन (12th std Student Evaluation) कसे होणार ? पदवी प्रवेश परीक्षांचे निकाल कसे आणि कधी लागणार ? असे प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारले जाऊ लागले आहेत. दरम्यान, उदय सामंत (Education Minister ) यांनी यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. शिक्षणंमंत्र्यांनी बारावीच्या परीक्षांसंदर्भात नुकतेच ट्वीट केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बारावी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील असे शिक्षणमंत्र्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. त्याअनुषंगाने प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. सरकर विविध पर्यायांचा विचार करत आहे. यूजी प्रवेशासाठी एक राज्यस्तरीय, विभाग पातळीवर सीईटी परीक्षा व्हावी असे आम्हाला वाटते असे सामंत म्हणाले. तसेच सरकारने यासाठी एक समिती बनवली आहे. ज्यामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांचे कुलगुरु, स्टेट सीईटी सेल आणि उच्च शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत. ही कमिटी याप्रकरणी रिपोर्ट बनवणार असल्याची महत्वाची माहिती त्यांनी दिली. नॉन प्रोफेशनल यूजी कोर्ससचे प्रवेश बारावीच्या गुणांवर व्हायचे. पण यावर्षी बारावी बोर्डाची परीक्षा झाली नाही. यामध्ये पहिल्या वर्षाचे यूजी कोर्सेस बॅचलर ऑफ आर्ट्स (BA admission 2021), बॅचलर ऑफ कॉमर्स (BCom admission 2021), बॅचलर ऑफ सायन्स ( BSc Admission 2021) साठी प्रवेश परीक्षा असेल असे सामंत म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2T9FXod
via nmkadda