मस्तच! इंजिनीअरिंगच्या शुल्कात २५ टक्के सवलत Rojgar News

मस्तच! इंजिनीअरिंगच्या शुल्कात २५ टक्के सवलत Rojgar News

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्यातील करोना परिस्थिती विचारात घेऊन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काव्यतिरिक्त इतर शुल्कात १६ हजार २५० रुपयांची (अंदाजे २५ टक्के) सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केली. शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त इंजिनीअरिंग संस्थेमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिकवणी शुल्काशिवाय इतर शुल्क भरावे लागते. करोनाकाळात विद्यार्थी कॉलेजांत प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने ग्रंथालय, जिमखाना अशा शैक्षणिक सुविधांचा वापर केला जात नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून हे शुल्क घेऊ नये, असे सामंत यांनी जाहीर केले. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व्हावी, म्हणून इतर शुल्कामध्ये १६ हजार २५० रुपयांची सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा २० हजार विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजीकल इन्स्टिट्यूट येथे गुरुवारी राज्यातील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज व संस्थांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ व संबंधित कॉलेजांचे प्राध्यापक उपस्थित होते. बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय - व्हीजेटीआय येथील मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने या वसतिगृहास 'मातोश्री' असे नामकरण करण्यास मान्यता - या संस्थांना शिक्षक आणि शिक्षकेतर पदे कंत्राटी तत्त्वावर स्वतःच्या निधीतून भरण्यास मान्यता - संस्थांच्या २०२०-२०२१ च्या अर्थसंकल्पासत्त्त्वत: मान्यता - संस्थांना शैक्षणिक उपयोगासाठी बांधकामाचे प्रस्ताव सरकारपुढे सादर करण्याच्या सूचना


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TVrdcR
via nmkadda

0 Response to "मस्तच! इंजिनीअरिंगच्या शुल्कात २५ टक्के सवलत Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel