बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर अशी असेल जेएनयू, जामिया आणि आयपीची प्रवेश प्रक्रिया Rojgar News

बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर अशी असेल जेएनयू, जामिया आणि आयपीची प्रवेश प्रक्रिया Rojgar News

: बारावी बोर्डाची परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे कसे होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान, जेएनयू, जामिया मिलिया इस्लामिया आणि आयपी विद्यापीठाती हे प्रवेश परीक्षेचे आयोजन करतात. म्हणून या विद्यापीठांवर याचा मोठा परिणाम होणार नाही. दिल्ली विद्यापीठ आणि आंबेडकर विद्यापीठातील पात्रता-आधारित प्रवेश परीक्षा ही सीबीएसईच्या पद्धतीनुसार होणार आहे. त्यामुळे या विद्यापीठांकडून सीबीएसईचे निकष जाहीर होण्याची वाट पाहीली जात आहे. सरकारने मंगळवारी करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. सीबीएसई बारावीच्या बोर्ड परीक्षा, काउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट्स एग्झामिनेशन (CISCE)ने कोरोना स्थिती पाहून बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या. पदवी अंतर्गत कोर्समधील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात विद्यापीठाची प्रवेश समिती आणि शैक्षणिक समितीशी चर्चा केली जाईल असे दिल्ली युनिव्हर्सिटी (DU)चे कार्यवाहक पीसी जोशी यांनी सांगितले. दिल्ली युनिव्हर्सिटीचे ९८ टक्के अर्जदार हे केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (CBSE) चे विद्यार्थी आहेत. ही परिस्थिती अनाकलनीय आहे. मेरिट मोजण्याचे काहीतरी प्रमाण असेल. सेंट्रल युनिवर्सिटीज कॉमन एंट्रेंस टेस्ट (सीयूसीईटी) हा एक चांगला मार्ग असू शकतो असेही ते म्हणाले. पीसी जोशी हे शिक्षण विभागाला अहवाल सोपावणाऱ्या CUCET समितीचे सदस्या आहेत. सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी एक सामान्य प्रवेश परीक्षा घेण्याचा निर्णय प्रलंबित आहे. आंबेडकर विद्यापीठ, जो डीयू कट-ऑफच्या आधारेही प्रवेश होऊ शकतो. यामुळे विद्यापीठांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल आणि पुढचे शैक्षणिक सत्र वेळेवर सुरु होण्यास मदत होईल. सीबीएसई बोर्ड १२ वीचे निकाल जाहीर करेल. अंडरग्रेजुएट कोर्सेससाठी प्रवेश प्रक्रियेचा योग्यतेवर आधारित असेल. जामिया मिलिया इस्लामिया (JMI), जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी ()आणि आयपी युनिव्हर्सिटीने प्रवेश परीक्षेचे आयोजन केले. त्यामुळे बोर्डाची परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाचा त्यांच्यावर प्रभाव झाला नाही असे जेएनयूचे कुलपती जगदीश कुमार यांनी म्हटले. बहुतेक उच्च शिक्षण संस्था (एचआयआय) जेएनयूसारख्या अधिकतर उच्च शिक्षण संस्थांमध्ये एक परीक्षेच्या माध्यमातून स्नातक कार्यक्रमांमध्ये प्रवेश होतो. जेव्हा विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सुरक्षित असेल तेव्हा आम्ही तिचे आयोजन करु असे ते म्हणाले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3phak81
via nmkadda

0 Response to "बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर अशी असेल जेएनयू, जामिया आणि आयपीची प्रवेश प्रक्रिया Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel