Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १ जून, २०२१, जून ०१, २०२१ WIB
Last Updated 2021-06-01T14:47:08Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

RRB NTPC Exam 2021: रेल्वे भरती बोर्डाची परीक्षा पुन्हा लांबणीवर Rojgar News

Advertisement
NTPC CBT-1 Exam 2021 Update, Sarkari Nokri 2021: बोर्डाने (RRB) आरआरबी एनटीपीसी 2019 (RRB NTPC CBT Exam 2021) संदर्भात नवी नोटीस जारी केली आहे. रेल्वेत नोकरी (Railway Jobs) चं स्वप्न पाहणाऱ्या आरआरबी एनटीपीसी च्या उमेदवारांना गेले अनेक दिवस भरती परीक्षेची प्रतीक्षा आहे. डिसेंबर २०२० मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली होती, पण करोना व्हायरस (covid19) महामारीमुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. ज्या उमेदवारांनी आरआरबी नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भरती 2019 साठी अर्ज केला होता, ते अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन नवीन नोटिस पाहू शकतात. नोटिफिकेशनची थेट लिंक या वृत्तात पुढे देण्यात आली आहे. आरआरबी एनटीपीसी भरती परीक्षा लांबणीवर का पडली? सोमवारी ३१ मे रोजी रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB) अधिकृत वेबसाइट वर जारी करण्यात आलेल्या नोटीशीच्या माध्यमातून बोर्डाने कळवलं आहे की काही राज्यांनी एनटीपीसी कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) आयोजित करण्यास नकार दिला आहे. बोर्डाने सांगितले आहे की, राज्यांमधील COVID 19 प्रतिबंधांमुळे सीबीटी परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. सुधारित तारखांची घोषणा बोर्डाद्वारे नंतर करण्यात येईल. अधिकृत नोटिशीत दिली महत्त्वाची माहिती आरआरबी एनटीपीसी 2019 संबंधी नोटीशीत म्हटले आहे की, 'कोविड -19 महामारीच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा प्रभावित राज्याद्वारे लावण्यात आलेल्या विविध निर्बंधांमुळे सीबीटी स्थगित करण्यात आली आहे. राज्यांनी लावलेले निर्बंध शिथील झाल्यानंतर परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जारी केले जाईल.' एप्रिलमध्ये झाली होती आरआरबी एनटीपीसीची पहिल्या टप्प्यातील परीक्षा आरआरबी एनटीपीसी 2019 भरती प्रक्रिया डिसेंबर २०२० मध्ये COVID 19 च्या पहिल्या लाटेनंतरच्या निर्बंधांनंतर सुरू झाली होती. आरआरबी एनटीपीसी 2019 च्या पहिल्या टप्प्यातील सहाव्या चरणाची परीक्षा एप्रिल 2021 मध्ये आयोजित करण्यात आली होती. आरआरबी एनटीपीसी चरण-६ (RRB NTCP Phase-6 exam 2021) परीक्षा १,३,५,६,७ आणि ८ एप्रिल २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3caOlui
via nmkadda