SBI Clerk Prelims 2021: स्टेट बँक भरतीची जूनमध्ये होणारी पूर्व परीक्षा स्थगित Rojgar News

SBI Clerk Prelims 2021: स्टेट बँक भरतीची जूनमध्ये होणारी पूर्व परीक्षा स्थगित Rojgar News

Recruitment 2021: भारतीय स्टेट बँकेत (State Bank of India) क्लर्क पदांच्या भरतीसाठी पूर्व परीक्षा जून २०२१ मध्ये होणार होती. पण आता याचा तारीख बदलण्यात आली आहे. करोना महामारी संक्रमणाच्या वाढत्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. एसबीआयच्या संकेतस्थळावर sbi.co.in येथे यासंबंधीची नोटिस जारी करण्यात आली आहे. देशभरात एसबीआयच्या (SBI) की विविध शाखांमध्ये ज्युनिअर असोसिएट/क्लर्कच्या तब्बल ५ हजारांहून अधिक पदांवर भरती होणार आहे. बँकेच्या या सरकारी नोकरीसाठी (Bank Jobs) २७ एप्रिल ते १७ मे २०२१ पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते. पूर्व परीक्षा जून २०२१ मध्ये होणार होती. आता एसबीआयने परीक्षेसंबंधी एक परिपत्रक जारी केलं आहे. यात असं म्हटलंय की कोविड-१९ महामारी (Covid-19) मुळे ज्युनिअर असोसिएट्स पदांच्या भरतीसाठी जून २०२१ मध्ये होणारी पूर्व परीक्षा पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणा नंतर केली जाईल. ऑनलाइन पूर्व परीक्षेत १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ परीक्षेचा समावेश असेल. ही परीक्षा ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे. ही परीक्षा १ तासाच्या कालावधी असेल. यात इंग्रजी भाषा (English language), संख्यात्मक क्षमता (Numerical ability) आणि तर्क क्षमता (reasoning ability) अशी तीन भागात परीक्षा होईल . या भरती प्रक्रियेद्वारे एसबीआयमध्ये ५२३७ ज्युनियर असोसिएट (ग्राहक सहायता आणि विक्री) पदे भरली जाणार आहेत. अधिक संबंधित तपशीलासाठी उमेदवारांनी SBI च्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TxEZ5l
via nmkadda

0 Response to "SBI Clerk Prelims 2021: स्टेट बँक भरतीची जूनमध्ये होणारी पूर्व परीक्षा स्थगित Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel