TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

SSC CGL Result 2021 परीक्षेत ४५,४६१ उमेदवार पात्र Rojgar News

Tier 3 Declared: कर्मचारी निवड आयोग ( किंवा SSC) ने कंबाइंड ग्रॅज्युएट लेवल (SSC CGL 2019) भरती परीक्षा टियर 3 चे निकाल जाहीर केले आहेत. जे उमेदवार २२ नोव्हेंबर २०२० रोजी एसएससी सीजीएल टियर 3 परीक्षेत उपस्थित राहिले होते, ते आता SSC ची अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जाऊन SSC CGL Result 2021 तपासू आणि डाऊनलोड करू शकतात. एसएससी सीजीएल टीयर-3 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची आकडेवारी १: असिस्टंट ऑडिट ऑफिसर (AAO) एकूण पात्र उमेदवार - २२३८ २: ज्युनियर स्टॅटेस्टिकल्स ऑफिसर (JSO) किंवा स्टॅटिसटिकल्स इंवेस्टिगेटर ग्रेड-II - १८६२ ३: पोस्ट्स फॉर CPT - १३९८२ ४: DEST साठी अन्य यादीतील पदे - २७३७९ टीयर-३ मध्ये एकूण पात्र उमेदवार - ४५ हजार ४६१ स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) द्वारे विविध पदांवर भरती सीजीएल (Combined Graduate Level) टियर 3 परीक्षा आयोजित केली होती, यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत उमेदवारांचा रोल नंबर, कॅटेगरी आणि नाव दिलं आहे. उमेदवार पुढे दिलेल्या थेट लिंकच्या माध्यमातून थेट आपला निकाल डाऊनलोड करू शकतात. Result 2021: निकाल कसा डाऊनलोड कराल? १: एसएससीच्या ऑफिशियल वेबसाइट ssc.nic.in वर जा. २: होमपेज वर, 'रिझल्ट' सेक्शन वर जा. ३: तेथे 'click here' given under 'Result' column against 'COMBINED GRADUATE LEVEL (CGL) EXAMINATION, 2019 (TIER-III) - LIST OF CANDIDATES IN ROLL NO. ORDER QUALIFIED FOR DEST & DOCUMENT VERIFICATION – (LIST-1 to 4)' वर क्लिक करा. ४: एसएससी सीजीएल टियर 3 रिझल्ट पीडीएफ उघडेल. ५: उमेदवारांनी येथे आपला रोल नंबर आणि नाव तपासावे. ६: पीडीएफ निकाल डाऊनलोड करावा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंट आउट घेऊन ठेवावे. SSC CGL Recruitment चा पुढचा टप्पा काय आहे? एसएससी टीयर-3 ज्या उमेदवारांची नावे आहेत, त्यांना पुढील टप्प्यासाठी बोलावले जाईल. पुढील टप्प्यात कागदपत्रे पडताळणी (DV), स्कील टेस्ट म्हणजेच कॉम्प्युटर प्रोफिशिएन्सी टेस्ट (CPT)आणि डाटा एन्ट्री स्कील टेस्ट (DEST) चा असेल. पुढील टप्प्यातील चाचण्यांच्या तारखांची घोषणा अधिकृत वेबसाइटवर केली जाईल. म्हणूनच उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3x32UIC
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या