Advertisement
2021-22: करोना महामारीमुळे शैक्षणिक प्रक्रियाही बाधित झाली आहे. अशात अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE)ने देशभरातील इंजिनिअरिंग आणि तंत्र संस्थांसाठी जारी केलेल्या सुधारित अकॅडेमिक कॅलेंडर २०२१-२२ ला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे. एआईसीटीईच्या सुधारित शैक्षणिक कॅलेंडर २०२१-२२ नुसार सर्व इंजिनिअरिंग आणि तंत्र संस्थांमधील वर्तमान विद्यार्थ्यांचे वर्ग १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होतील. नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होतील. यापूर्वीच्या कॅलेंडरनुसार, वर्तमान विद्यार्थ्यांसाठी १ सप्टेंबर आणि फ्रेशर्ससाठी १५ सप्टेंबरपासून कॉलेज सुरू होणार होते. अशाच प्रकारे, एआईसीटीईच्या नव्या कॅलेंडरनुसार संस्थांमध्ये पहिल्या फेरीची समुपदेशन प्रक्रिया म्हणजेच काऊन्सेलिंग ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत संपणार आहे. दुसऱ्या फेरीचे काऊन्सेलिंग १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत होणार आहे. प्रवेश रद्द किंवा शुल्क परताव्याची अखेरची मुदत १५ ऑक्टोबर २०२१ आहे. उमेदवारांनी ध्यान द्यावे की सर्व संस्था २० ऑक्टोबरपर्यंत प्रवेश करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयकडून परवानगी एआईसीटीईद्वारे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी सुधारित शैक्षणिक कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. कोविड-१९ महामारीचा तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आणि सीबीएसई, आयसीएसई तसेच राज्य मंडळांद्वारे विलंबाने लागणारा बारावीचा निकाल या पार्श्वभूमीवर परिषदेद्वारे रिवाइज्ड अॅकेडेमिक कॅलेंडर तयार करण्यात आलं आहे. मागील वर्षी देखील सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांनुसार, इंजिनीअरिंग तसेच तंत्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी शैक्षणिक कॅलेंडर तयार करण्यात आलं होतं.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hB9eSh
via nmkadda