TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Atmanirbhar Bharat रोजगार नोंदणीची तारीख वाढली, काय होणार फायदा ? जाणून घ्या Rojgar News

Atmanirbhar Bharat Rojgar Yojana: आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेत नोंदणीसाठी अंतिम तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२१ होती. पण आता ही तारीख वाढवून ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे.यामाध्यमातून ७१.८ लाख नागरिकांना रोजगार प्राप्त होणार आहे. २१.४२ लाख लाभार्थ्यांना आतापर्यंत ९०२ कोटी रूपयांचे लाभ झाला आहे. गेल्यावर्षी करोना काळात सरकारने सुरु केली होती. करोनातून सावरल्यानंतर रोजगाराच्या संधी वाढवणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. यासाठी सरकार आणि बॅंकांनी २७.१ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही रक्कम देशाच्या जीडीपीच्या १३ टक्के आहे. २८ जूनला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पॅकेज जाहीर केले होते. याअंतर्गत नोंदणी करण्याची तारीख मार्च महिन्यापर्यंत वाढविण्यात आले आहे. ३० जून ही तारीख वाढवून ३१ मार्च २०२२ पर्यंत करण्यात आली आहे. याअंतर्गत १५ हजार पर्यंत पगार मिळविणाऱ्यांना फायदा होणार आहे. आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. याअंतर्गत १२ नव्या योजना सुरु झाल्या आहेत. ज्यामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत होणार असल्याचे म्हटले जात आहे. नोकरी आणि व्यवसाय क्षेत्राला याचा फायदा होणार आहे. यामध्ये २७.१ लाख कोटीची गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्यमातून ७१.८ लाख नोकऱ्या निर्माण होतील असा तर्क लावला जात आहे. तसेच या योजनेसाठी लागणारा खर्च वाढवून २२ हजार ०९८ कोटी रुपये करण्यात आला आहे. ज्या कंपन्या ईपीएफओशी जोडल्या गेल्या आहेत आणि ज्यांचा पगार प्रतिमहीना १५ हजार आहे, अशांना याचा फायदा होणार आहे. एबीआरवाय योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या सहभागाची रक्कम सलग दोन वाढणार आहे. १८ जूनपर्यंत एकूण २१.४२ लाख जणांना आणि ७९,५७७ कंपन्यांना लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत ९०२ कोटी खर्च केले गेले आहेत. ज्यामध्ये २१.४२ लाख जणांना लाभ झाल्याचे सांगण्यात येत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wgNiAb
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या