Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ५ जुलै, २०२१, जुलै ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-05T09:47:07Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CA July Exams 2021 सीए जुलै परीक्षांना सुरुवात Rojgar News

Advertisement
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियातर्फे (Institute of Chartered Accountants of India, ICAI) सीए जुलै परीक्षा २०२१ सोमवार ५ जुलै पासून सुरू झाली आहे. फायनल आणि इंटरमीडिएट अभ्यासक्रमाच्या परीक्षा ५ ते २० जुलै २०२१ या कालावधीत देशभरातील विविध केंद्रांवर आयोजित केल्या जाणार आहेत. या परीक्षा पार पडत असताना शिक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयाद्वारे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करायचे आहे. परीक्षा केंद्र, केंद्र अधीक्षक, पर्यवेक्षक आणि उमेदवारांना करोनाविषयक नियमांचे पालन करावे लागेल. परीक्षा सुरू होण्यापूर्वी बसण्याचा जागा सॅनिटाइज केली जोईल. सर्व दारे, हँडल, जिन्यांचे रेलिंग आदि डिसइन्फेक्ट केले जातील. या व्यतिरिक्त उमेदवार स्वत: देखील आपली बसण्याची जागा स्वत:जवळील सॅनिटायझरने स्वच्छ करू शकतील. या व्यतिरिक्त उमेदवारांकडे अतिरिक्त सुरक्षेसाठी फेस शील्ड, हातमोजे नेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. उमेदवारांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत बैठक व्यवस्था केली जाईल. दोन उमेदवारांमध्ये पुरेसे अंतर असेल. उमेदवार आणि परीक्षा केंद्रातील कर्मचाऱ्यांना प्रवेश द्वार आणि परीक्षा केंद्रातील प्रमुख ठिकाणी हँड सॅनिटायझर उपलब्ध करून दिले जाईल. उमेदावारांना परीक्षा हॉलमध्ये फेस मास्क, फेस शील्ड, हातमोजे, वैयक्तिक पाण्याची पारदर्शक बाटली, लहान हँड सॅनिटायझर आदि सोबत बाळगण्याची परवानगी असेल. सुप्रीम कोर्टाने ही परीक्षा ऑफलाइन घेण्यासाठी मागील आठवड्यात परवानगी दिली. उमेदवारांना विस्तृत ऑप्ट आऊट सुविधा देण्यासंबंधी आयसीएआयला निर्देशही दिले. त्यानुसार संस्थेने उमेदवारांसाठी विस्तृत ऑप्ट-आउट सुविधेसंदर्भात नोटिस जारी केली आहे. परीक्षेसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yoiWNz
via nmkadda