TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Career Options: करिअरनिवडीची नको घाई Rojgar News

सुचित्रा सुर्वे, ग्रोथ सेंटर उदाहरण १. 'माझ्या मुलीला (जी आठवीत आहे) संशोधनात रस आहे', 'माझ्या मुलाला (जो सध्या नववीत आहे) विविध मशीन्सची आवड आहे', 'मी माझ्या मुलीला चांगलंच ओळखते आणि मला खात्री आहे की ती फक्त आयआयटीमध्येच प्रवेश घेणार.'... ही आणि यासारखी अनेक वाक्यं तुम्ही बऱ्याचदा ऐकली असतील. मला खात्री आहे की बरेच पालक या उदाहरणांशी नक्कीच कनेक्ट होतील. मान्य आहे की लहान वयातच आपले मूल कशात चांगले आहे हे ओळखणे, समजून घेणे आवश्यक आहे. परंतु, एवढ्या लवकर घेतलेल्या निर्णयावर आपण कायमस्वरूपी खरंच अवलंबून राहू शकतो का? पहिल्यांदा कुतूहल आणि पॅशन यामधील फरक समजून घेऊ या. काही अपवाद वगळले तर बहुतांश विद्यार्थ्यांमध्ये, एका विशिष्ट क्षेत्राशी जोडलेले ग्लॅमर आणि त्यामुळे निर्माण झालेली उत्सुकता किंवा आकर्षण दिसून येते. एखाद्या क्षेत्रात लागणारे कष्ट, आव्हाने या सगळ्याची पर्वा न करता त्या क्षेत्रात काम करण्याची उत्कट इच्छाशक्ती असणे म्हणजे पॅशन होय. तेव्हा एक पालक म्हणून आपल्या मुलास एखाद्या क्षेत्राबाबत केवळ कुतूहल आहे की पॅशन आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. किशोरवयीन मुलांचा विचार करता कुतूहलाची किंवा रुची असण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच केवळ या गोष्टीच्या जोरावर आपल्या मुलांना प्रोत्साहित करण्यापूर्वी जरा थांबा... एखाद्या क्षेत्राबाबत आपल्या पाल्यास काय माहिती आहे? त्या माहितीचा स्रोत कोणता आहे? केवळ दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊन घेतलेला निर्णय नाही ना? निवडलेल्या क्षेत्रात यश प्राप्त करण्यासाठी आवश्यक प्रयत्नांची माहिती त्यांना आहे का? इत्यादी प्रश्न तुमच्या पाल्यास विचारा आणि या सगळ्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास योग्य ती पावले उचलण्यास, मार्गदर्शन करण्यास काहीच हरकत नाही. हे केवळ कुतूहल असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. करिअर निवडीची घाई करण्यापेक्षा विविध करिअर पर्यायांबाबत माहिती मिळवण्यासाठी पाल्यास थोडा वेळ द्या. तुम्हीदेखील त्याच्याबरोबर विविध पर्याय चाचपून पाहण्याचा प्रयत्न करा. उदाहरण २. 'मला डेटा सायंटिस्ट होण्यात रस आहे', 'इन्व्हेस्टमेंट बँकिंग किंवा पोर्टफोलिओ मॅनेजमेंट केवळ यापैकीच एका पर्यायाची मी निवड करणार आहे', 'मला फूड स्टायलिस्ट व्हायचे आहे', 'क्रिमिनल लॉबाबत मला आकर्षण आहे.' माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांकडून अशी वाक्यं ऐकली, की एक करिअरतज्ज्ञ म्हणून कायम प्रश्न पडतो; केवळ 'कूल', 'काहीतरी हटके', 'ट्रेंडी' आहे म्हणून एखादे क्षेत्र निवडायचे आहे, की खरंच त्याबाबत आवड आहे? त्या क्षेत्राबाबत खरंच माहिती आहे का? सध्या प्रसिद्ध असलेल्या विविध सीरिजमधील त्या क्षेत्राबाबत दाखवलेल्या ग्लॅमरचा हा प्रभाव आहे? जरी सामान्यीकरण करता येणे शक्य नसले, तरी सध्या बरेच किशोरवयीन विद्यार्थी अशा करिअर्सबाबत बोलत आहेत, ज्यात उच्च शिक्षण आणि विशिष्ट क्षेत्रातील कामाच्या अनुभवाची आवश्यकता आहे. क्रीडा किंवा कला क्षेत्राबाबत म्हणायचे तर त्यात तुमच्या प्रतिभेस अधिक महत्त्व आहे. याउलट शैक्षणिक क्षेत्रात शिक्षण व्यवस्थेचा भाग असण्याबरोबर नियमित तयारी, प्रवेश प्रक्रिया आणि प्रशिक्षणाची गरज आहे. याचा अर्थ क्रीडा किंवा कला क्षेत्रास प्रशिक्षणाची आवश्यकताच नाही असे नाही. पण, या क्षेत्राशी निगडित प्रशिक्षण प्रणालीपुरते मर्यादित नसून बाहेरूनही पूर्ण केले जाऊ शकते. हा फरक समजून घेऊन ज्यांचा कल (लहान वयापासून) शैक्षणिक मार्गांकडे आहे त्यांनी वर नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करणे आवश्यक आहे. तुमच्या पॅशनचे मूळ कारण, उपलब्ध असलेले विविध पर्याय समजून घ्या. तसेच योग्य मार्गाची निवड करण्यासाठी, स्वतःला अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यास विसरू नका.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ANFTMi
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या