Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २१ जुलै, २०२१, जुलै २१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-21T06:45:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 10th 12th Result 2021: सीबीएसई दहावी-बारावी निकालासंदर्भात ताजी अपडेट जाणून घ्या! Rojgar News

Advertisement
CBSE 10th 12th Result 2021: सीबीएसई दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डातर्फे (CBSE)निकालाचे काम २१ जुलैला सुट्टीच्या दिवशी देखील सुरु आहे. दिलेल्या वेळेत दहावी (CBSE Matric Result 2021) आणि बारावी (CBSE Inter result 2021) चा निकाल लावण्यासाठी बोर्डातर्फे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. बारावी निकालास अंतिम स्वरुप देण्याची तारीख २२ जुलै असल्याचे सीबीएसईने २० जुलैच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले होते. निकाल तयार करण्यासाठी शाळेतील शिक्षक, परीक्षा विभाग आणि मुख्यालयातील विभागीय अधिकारी सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत काम करणार आहेत. केव्हा येणार रिझल्ट? (CBSE 10th, 12 result) सीबीएसई दहावी आणि बारावी निकालाच्या तारखेची घोषणा करण्याचा निर्णय बाकी आहे. बोर्डाने एका अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले की, दोन्ही परीक्षांच्या निकालाची तारीख अंतिम करण्यावर निर्णय होणार आहे. सीबीएसईतर्फे दहावीच्या निकालाची घोषणा bse result 2021) २५ जुलैच्या आधी होऊ शकते. तर बारावीच्या रिझल्टची घोषणा ३१ जुलैपर्यंत केली जाऊ शकते. सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल अधिकृत वेबसाइट cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. तसेच डिजिलॉकरच्या माध्यमातून देखील तपासला जाणार आहे. डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवर सीबीएसई पास प्रमाणपत्र उपलब्ध होईल. असा तपासा निकाल? सीबीएसई निकाल २०२१ ची घोषणा झाल्यानंतर वर दिल्या गेलेल्या अधिकृत वेबसाइटवर जा. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा. तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. भविष्यातील उपयोगासाठी याची प्रत राखून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hT9VXx
via nmkadda