Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २१ जुलै, २०२१, जुलै २१, २०२१ WIB
Last Updated 2021-07-21T07:45:24Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE 12th std Result: सीबीएसई बारावी निकालाच्या तारखेसंदर्भात महत्वाची घोषणा Rojgar News

Advertisement
CBSE 12th std Result: बोर्डाने आपल्या नियोजित वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीचा निकाल २० जुलैपर्यंत जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. पण सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करण्यास काही दिवसांचा अवधी लागेल असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. सीबीएसईला ३१ जुलेपर्यंत बारावीचा निकाल जाहीर करायचा आहे. बारावीचा निकाल जाहीर करण्यास उशीर झाला तर कॉलेजमधील प्रवेशाला देखील उशीर होणार आहे. देशातील विविध विद्यापीठांमध्ये पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली बॅच १ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होणार आहे. यूजीसीचे सचिव रजनीश जैन यांनी यासंदर्भात एक नोटीस जाहीर केली आहे. त्यानुसार सर्व विद्यापीठ, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांनी सीबीएसई बोर्ड बारावी आणि इतर राज्यांतील बोर्डाचे निकाल जाहीर झाल्यानंतर नव्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान सीबीएसई दहावी बोर्डाच्या रिझल्टबद्दल परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थांना निष्पक्षपणे पूर्ण निकाल देण्याआधी शाळांसोबत समन्वय करुन काळजीपूर्वक डेटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. सीबीएसईने २० जुलैला दहावीच्या निकालाची घोषणा केली नाही. सीबीएसई बोर्ड हे शाळांसोबत डेटा गोळा करण्यासाठी दिवसरात्र काम करत असल्याचे ते म्हणाले. बारावी निकालास अंतिम स्वरुप देण्याची तारीख २२ जुलै असल्याचे सीबीएसईने २० जुलैच्या अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले होते. निकाल तयार करण्यासाठी शाळेतील शिक्षक, परीक्षा विभाग आणि मुख्यालयातील विभागीय अधिकारी २१ जुलैला सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सकाळी १० ते ५ या वेळेत काम करत आहेत. केव्हा येणार रिझल्ट? (CBSE 10th, 12 result) सीबीएसई दहावी आणि बारावी निकालाच्या तारखेची घोषणा करण्याचा निर्णय बाकी आहे. बोर्डाने एका अधिकृत स्टेटमेंटमध्ये म्हटले की, दोन्ही परीक्षांच्या निकालाची तारीख अंतिम करण्यावर निर्णय होणार आहे. सीबीएसईतर्फे दहावीच्या निकालाची घोषणा bse result 2021) २५ जुलैच्या आधी होऊ शकते. तर बारावीच्या रिझल्टची घोषणा ३१ जुलैपर्यंत केली जाऊ शकते. सीबीएसई दहावी आणि बारावीचा निकाल अधिकृत वेबसाइट cbse.nic.in आणि cbseresults.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. तसेच डिजिलॉकरच्या माध्यमातून देखील तपासला जाणार आहे. डिजिलॉकर प्लॅटफॉर्मवर सीबीएसई पास प्रमाणपत्र उपलब्ध होईल. असा तपासा निकाल? सीबीएसई निकाल २०२१ ची घोषणा झाल्यानंतर वर दिल्या गेलेल्या अधिकृत वेबसाइटवर जा. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. सीबीएसई रिझल्टच्या लिंकवर क्लिक करा. या पेजवर दहावी आणि बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. मागितलेली माहिती भरुन लॉगिन करा. तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. इथे विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतात. भविष्यातील उपयोगासाठी याची प्रत राखून ठेवा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2VTkRLZ
via nmkadda