Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, २८ जुलै, २०२१, जुलै २८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-28T09:43:22Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE Board 10th Result 2021: सीबीएसई दहावीच्या निकालाची घोषणा उद्या? जाणून घ्या अपडेट Rojgar News

Advertisement
10th Result 2021: ३१ जुलै ही तारीख जवळ येतेय तसे रिझल्ट २०२१ संबंधी देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या मनातील शंका वाढत चालल्या आहेत. सीबीएसई दहावी रिझल्ट २०२१ ची घोषणा उद्या २९ जुलै २०२१ ला केली जाण्याची शक्यता आहे. सीबीएसई बोर्डाच्या समितीमध्ये असलेल्या एका शाळेच्या प्रिंसिपलकडून ही माहिती मिळाली आहे. एका प्रिंट मीडियाला त्यांनी ही माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निकालाची वेळ ठरली आहे. सीबीएसई निकाल तयार झाले आहेत. रिझल्टची घोषणा करण्याच्या तयारीसाठी दिवस रात्र एक करुन काम केले जात आहे. दहावीच्या निकालाची उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. सीबीएसई दहावीचा निकाल अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतर रिझल्ट पोर्टल , cbseresults.nic.in वर अॅक्टीव्ह केला जाईल. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तुम्ही डिजिलॉकरच्या माध्यमातून देखील पाहू शकता. डिजिलॉकर अॅप आणि उमंग अॅपवर हा निकाल पाहता येईल. तसेच बोर्डाने सीबीएसई २०२१ निकाल एसएमएस आणि आयवीआरएस माध्यमातून तपासण्याची व्यवस्था केली आहे. या विविध पर्यायांबद्दलची माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. डिजिलॉकरमध्ये रिझल्ट कसा तपासाल?सीबीएसई रिझल्ट २०२१ हा डिजिलॉकरमध्ये उपलब्ध होणार आहे. डिजिलॉकर अकाऊंटमध्ये लॉगिन करुन विद्यार्थी मार्कशिट, मायग्रेशन सर्टिफिकेट्स आणि स्किल सर्टिफिकेटसारखे महत्वाचे डॉक्युमेंट हाताळू शकतात. विद्यार्थ्यांना कागदपत्र त्यांच्या संबंधित डिजिलॉकर अकाऊंटमध्ये पाठवले जातील. डिजिलॉकर हे डॉक्यूमेंट्सची साठवणूक, शेअरिंग आणि पडताळीसाठी सुरक्षित क्लाऊट आधारित प्लॅटफॉर्म आहे. डिजिलॉकर ही सुविधा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व आयटी विभागाने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली महत्त्वाची कागदपत्रे डिजिटल स्वरूपात साठवता येतात. त्यामुळे कागदपत्रांचा अनावश्यक वापर टळतो. 'नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन'मार्फत ही सेवा पुरविण्यात येते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BOW0cR
via nmkadda