Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २३ जुलै, २०२१, जुलै २३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-23T07:43:39Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

CBSE ऑफिसच्या बाहेर बारावी खासगी विद्यार्थ्यांचे आंदोलन, नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे बढतीची मागणी Rojgar News

Advertisement
Result2021: करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. असे असले तरी बारावीच्या खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली नाही. सीबीएसईने बुधवारी या परीक्षांची घोषणा केली. त्यानंतर सीबीएसई बारावीचे खासगी आणि सेकंड कंपार्टमेंटचे साधारण १ लाख विद्यार्थी या परीक्षेला विरोध करत आहे. नियमित विद्यार्थी आणि आमच्यात फरक करुन नये. आम्हाला देखील प्रमोट केले जावे अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. गेले काही दिवस विद्यार्थी यासाठी ट्वीटरवर कॅम्पेन देखील चालवत आहेत. याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मंगळवारी विद्यार्थ्यांनी आपल्या आंदोलनाची तीव्रता वाढवली. विद्यार्थ्यांनी एकीकडे सीबीएसई ऑफिसच्या बाहेर शांततापूर्ण आंदोलन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत आपले म्हणणे सीबीएसईपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. तर दुसरीकडे ट्वीटरवरर #WakeupCBSE हा ट्रेंड केला. परीक्षा कधी? खासगी विद्यार्थ्यांसाठी होणारी परीक्षा ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये घेतली जाणार आहे. ही परीक्षा १६ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होऊन १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत असणार आहे. रिझल्टची घोषणा देखील कमीत कमी वेळेत होणार आहे. विद्यार्थ्यांचे काय म्हणणे? नियमित विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा रद्द केल्यानंतर खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा का घेतली जातेय? नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा का रद्द केली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. सीबीएसईचे नियमित विद्यार्थी स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत तर दुसरीकडे खासगी विद्यार्थी त्यांच्या भविष्याचे काय होणार? याची काळजी करत असल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले. NEET-UG, CLAT, JEE-Mains या परीक्षा येणाऱ्या दिवसांमध्ये होतील. NEET-UG ही परीक्षा १२ सप्टेंबरला आहे. अशावेळी या परीक्षांची तयारी करायची की बोर्डाच्या परीक्षेची तयारी करायची? असा प्रश्न विचारला जातोय. बऱ्याच विद्यार्थ्यांनी परदेशी शिक्षणासाठी अर्ज केला असून १५ ऑगस्टपर्यंत त्यांना कागदपत्रांसह नोंदणी करणे आवश्यत आहे. यावर परीक्षेच्या निकालामुळे परीणाम पडू शकतो. त्यामुळे खासगी विद्यार्थ्यांची परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होतेय. सीबीएसईचे काय म्हणणे? नियमित विद्यार्थ्यांप्रमाणे खासगी विद्यार्थ्यांचा डेटा शाळांकडे किंवा बोर्डाकडे उपलब्ध नाही. त्यांची यूनिट टेस्ट, मिड टर्म, प्री बोर्ड एक्झाम असे काही झाले नाही. अशावेळी विना बोर्ड एक्झाम त्यांचा निकाल तयार करणे शक्य नाही. ही बाब सुप्रीम कोर्टाच्या समोर देखील ठेवण्यात आली होती.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2V91NJd
via nmkadda