Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ७ जुलै, २०२१, जुलै ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-07T07:47:01Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

बॅंक, रेल्वेच्या सरकारी नोकरीसाठी CET केव्हा? केंद्रीय मंत्र्यांनी दिली माहिती Rojgar News

Advertisement
CET for Central 2022: रेल्वे, एसएससी आणि आयबीपीएस परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. देशातील करोना प्रादुर्भावामुळे नॉन टेक्निकल समुहाच्या बी आणि सी सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी पहिली कॉमन एलिजिबिलिटी टेस्ट (CET) अद्याप होऊ शकली नाही. ही परीक्षा हे वर्ष संपेपर्यंत होण्याची शक्यता नाही. ही परीक्षा आता पुढच्यावर्षी होणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली. राष्ट्रीय भरती एजन्सी (NRA)द्वारे नॉन टेक्निकल समूह बी आणि सी सरकारी कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी उमेदवारांचे स्क्रिनिंग/ शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. दरम्यान यासाठी आधी कर्मचारी निवड आयोग (SSC), रेल्वे भरती बोर्ड (RRB) आणि इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन(IBPS) संस्थेच्या माध्यमातून केली जाते. IAS अधिकाऱ्यांच्या ई-बुक सिव्हिल लिस्ट-२०२१च्या उद्घाटनावेळी केंद्रीय मंत्री बोलत होते. केंद्र सरकारच्या नोकर भरतीसाठी उमेदवारांचे स्क्रिनिंग आणि शॉर्टलिस्ट करण्याची प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरु झाली आहे. ही प्रक्रिया हे वर्ष संपण्याआधी सुरु होणे अपेक्षित होते. पण करोना प्रादुर्भावाचा परिणाम यावर झाला आहे. त्यामुळे या प्रक्रियेस वेळ लागणार असल्याचे ते म्हणाले. CET भरती होणार सोपी CET च्या माध्यमातून तरुण वर्गाला खूप चांगल्या संधी उपलब्ध होतील. यामुळे भरती प्रक्रिया सोपी होणार आहे. दूरवर राहणाऱ्या उमेदवारांसाठी देखील हे वरदान ठरणार असल्याचे जितेंद्र सिंह म्हणाले. NRA ही एक मल्टी एजन्सी बॉडी असेल जी ग्रुप बी आणि सी (नॉन टेक्निकल) पदांसाठी स्क्रिनिंग आणि सामान्य परीक्षा आयोजित करणार आहे. यामुळे देशातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये किमान एक परीक्षा केंद्र असेल जे दूरवर राहणाऱ्या उमेदवारास तिथे पोहोचण्यास मदत करेल. हा या बदलाचा मोठा फायदा असल्याचे ते म्हणाले. कागदपत्र गॅजेट अधिकाऱ्यांकडून तपासण्याच्या प्रथेत बदल २०१४ नंतर सरकारद्वारे अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार गॅजेट अधिकाऱ्याद्वारे कागदपत्र पडताळणीची पद्धत बंद करण्यात आली आहे. याऐवजी सेल्फ अटेस्टेड केले जाते. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीस केंद्र सरकारसोबत सहायक सचिव म्हणून तीन महिने काम करणे अनिवार्य असणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3wnx5t0
via nmkadda