Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ३० जुलै, २०२१, जुलै ३०, २०२१ WIB
Last Updated 2021-07-30T13:43:48Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

COVID-19: 'या' देशांनी हटविले भारतीय विद्यार्थ्यांवरील प्रवासाचे निर्बंध, परदेशी शिक्षणाचा मार्ग मोकळा Rojgar News

Advertisement
COVID-19: भारतातील लसीकरण सुरु असले तरी करोना अजून संपलेला नाही. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी भारतीय विद्यार्थ्यांवर आपल्या देशास येण्यात निर्बंध घातले होते. यामुळे परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे जास्त नुकसान झाले होते. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि जर्मनीसहित अनेक देशांचा यामध्ये समावेश होता. पण आता या देशांकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. करोना स्थितीमध्ये सुधार झाल्यावर आणखी काही देश देखील असे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. आता भारतीय विद्यार्थ्यांचा परदेशात शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. इतर देशातील विद्यापीठांमध्ये शिकू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवासात शिथिलता देण्याचा सरकार प्रयत्न करत असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरली मुरलीधरन यांनी राज्यसभेत सांगितले. भारतात दुसरी लाट आल्यानंतर अनेक देशांनी भारतीयांच्या प्रवासावर निर्बंध आणले होते. पण परदेशातील विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले. इतर देशांसोबत यासंदर्भात बोलणी सुरु आहेत. आम्ही त्यांना भारतीय प्रवाशांवरील निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यास सांगत आहोत. प्रवास निर्बंधांचा मुद्दा अनेक देशातील मंत्री स्तरावर देखील उचलण्यात आल्याचे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, भारतीय विद्यार्थ्यांना संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा, यूके, आयरलॅंड, जर्मनी, नॅदरलॅंड, बेल्जियम, लक्जमबर्ग, जॉर्जियासहित अनेक देशांमध्ये प्रवास करण्यासाठी निर्बंधांमध्ये शिथिलता दिली जात आहे. परिस्थिती सुधारली तर अनेक देशांमध्ये निर्बंध शिथिल होती. मुरलीधरन पुढे म्हणाले, परदेशात भारतीयांचे हित ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे.राष्ट्रीय प्रयत्न आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून भारत सुरु असलेल्या महामारीसोबत लढत आहे. देशात करोना वायरसच्या एकाहून अधिक लाट आल्या आहेत. सरकारद्वारे दिले गेलेले स्टेटमेंट, भारताचे राष्ट्रीय प्रयत्न, आंतरराष्ट्रीय सहयोग आणि महामारीच्या सध्याच्या परिस्थितीवर सर्वकाही अवलंबून आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3C7Jllw
via nmkadda