Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T06:47:04Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

Degree Admission 2021 पदवी प्रवेशांसाठी बारावीचे गुण की सीईटी? पेच सुटेना... Rojgar News

Advertisement
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर निकाल कसा जाहीर करायचा, मूल्यमापनासाठी कोणते सूत्र वापरायचे, याबाबत घोषणा केली आहे. यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ती प्रथम वर्ष पदवी प्रवेशाची. हे प्रवेश बारावीच्या गुणांवर व्हावेत, की त्यासाठी ऐच्छिक प्रवेश परीक्षा असावी याबाबत मतमतांतरे आहेत. करोनामुळे रद्द करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने घेतला. निकाल कोणत्या निकषांवर जाहीर करायचा याबाबत आता अंतिम निर्णय झाला आहे. मात्र आता कशा प्रकारे द्यावेत त्यासाठी बारावीचे गुण ग्राह्य धरावेत की अकरावी प्रवेशाप्रमाणे ऐच्छिक प्रवेश परीक्षा घ्यावी याबाबत चर्चा सुरू आहे. बारावी परीक्षेच्या निकालाबाबत झालेल्या सभेदरम्यान पदवीच्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी सरसकट प्रवेश परीक्षा घेतल्यास त्यावर तोडगा निघेल, अशा सूचना प्राचार्यांकडून या बैठकीत करण्यात आल्या होत्या. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ज्याप्रमाणे प्रवेश परीक्षा होते, त्याप्रमाणेच ही प्रवेश परीक्षा व्हावी, अशी सूचना काही प्राचार्यांनी केली होती. तर काही प्राचार्यांनी, ही परीक्षा अकरावीच्या प्रवेश परीक्षेप्रमाणेच ऐच्छिक असावी, असेही मत मांडले होते. यानुसार आता ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार आहे. राज्यातील सर्वच पारंपरिक विद्यापीठांमध्ये पदवीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्या स्तरावर नियोजन केले जाते आणि ती प्रक्रिया राबवली जाते. मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारित येणाऱ्या कॉलेजांमध्ये प्रवेशावेळी विद्यापीठामार्फत प्रवेशासाठी नोंदणी केली जाते. यानंतर प्रवेश मात्र कॉलेज स्तरावर घेतले जातात. काही विद्यापीठांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया असते. यामुळे अकरावीप्रमाणे प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठीही केंद्रीभूत प्रक्रियेचे नियोजन करावे अशीही चर्चा आहे. याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून होत आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3k8H8j6
via nmkadda