Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ९ जुलै, २०२१, जुलै ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-07-09T08:47:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

DTE Admission: बारावीनंतर पूर्ण वेळ डिप्लोमा अभ्यासक्रमांचे प्रवेश कधी? जाणून घ्या... Rojgar News

Advertisement
तंत्रशिक्षण संचालनालयाने (Directorate of Technical Education, )बारावीनंतरच्या विविध डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. शनिवार १० जुलैपासून या डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. स्वत: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. फार्माकोलॉजी, हॉटेल मॅनेजमेंट अँड फूड अँड बेवरेज टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी अशा विविध पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवली जाते. दरवर्षी बारावीच्या परीक्षांनंतर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. शनिवारी १० जुलै २०२१ रोजी तंत्रशिक्षण संचालनायामार्फत डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसंबंधी अधिकृत नोटिफिकेशन जारी केले जाणार आहे. डीटीईच्या अधिकृत संकेतस्थळावर हे नोटिफिकेशन उपलब्ध करून देण्यात येईल. इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याची पद्धत, मेरिट लिस्टची तारीख आदी माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्यावी. ऑनलाइन रजिस्ट्रेशन, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज आदी सर्व माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात येईल. अभ्यासक्रम राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, विद्यापीठ संलग्न खासगी अनुदानित संस्थामध्ये उपलब्ध आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qVVAMR
via nmkadda