DU Admission 2021: दिल्ली विद्यापीठामध्ये पीजी, एमफिल आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी सुरु Rojgar News

DU Admission 2021: दिल्ली विद्यापीठामध्ये पीजी, एमफिल आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी सुरु Rojgar News

2021: करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कॉलेजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन, एमफिल आणि पीएचडी कोर्ससाठी प्रवेश () सुरु झाले आहेत. , एमफिल आणि पीएचडीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार विद्यापीठाची अधिकृत वेबसाइट du.ac.in वर जाऊन अर्ज करु शकतात. दिल्ली विद्यापीठाने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार प्रवेश परीक्षा (डीयूईटी) आधारित कोर्सेससाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. पदवी अंतर्गत कोर्सेसमध्ये प्रवेश (DU Admission 2021) घेण्यासाठी दिल्ली विद्यापीठ प्रवेश २०२१ प्रक्रिया पुढचे दोन आठवडे म्हणजे २ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. अर्ज प्रक्रिया गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी देखील पदवीअंतर्गत प्रवेशासाठी केंद्रीकरण सिस्टिम असणार आहे. एकाच अर्जाच्या माध्यमातून सर्व कॉलेज आणि विभागाचे फॉर्म भरले जाऊ शकतात. पदव्युत्तर प्रवेशासाठी एकाहून अधिक कोर्सेसला प्रवेश घेण्यासाठी देखील एकच अर्ज असेल. पण अर्ज शुल्क वेगवेगळे असेल. विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही प्रवेश प्रक्रिया सहज, सोपी बनवू इच्छित आहोत. यामुळे विद्यार्थी प्रवेशापासून शुल्क भरण्याची प्रक्रिया घरबसल्या सहज पूर्ण करु शकतील. नवे अभ्यासक्रम दिल्ली विद्यापीठामध्ये सन २०२१-२२ मध्ये प्रवेश प्रक्रिया आधारित कोर्सेसमध्ये बॅचलर ऑफ फिजिओथेरेपी, बॅचलर ऑफ ऑक्यूपेशन थेरेपी, बॅचलर ऑफ प्रोस्थेटिक्स अॅण्ड ऑर्थोटिक्स आणि मास्टर ऑफ फिजिओथेरेपी यांचा समावेश केला आहे. नोंदणी शुल्क प्रत्येक कॉलेजांमधील एकूण ५ टक्के जागा या स्पोर्ट्स कोटा आणि एक्स्ट्रा करिक्यूलर अॅक्टीव्हिटीच्या आधारे भरल्या जातील. ज्या उमेदवारांना NET क्वालीफाइड केली नाही त्यांना देखील पीजी अभ्यासक्रमाच्या प्रवेशसाठी DUET परीक्षा द्यावी लागेल. मेरिट आणि प्रवेश परीक्षेच्या आधारे प्रवेश घेताना शुल्कामध्ये कोणता बदल होणार नाही. जागांची संख्या डीयूमध्ये पदवी अंतर्गत ६५ हजार आणि पदव्युत्तरच्या २० हजार जागा आहेत. यूजी कोर्सेस (DU UG Courses)मध्ये मेरिटच्या आधारे प्रवेश मिळेल. उमेदवाराच्या पात्रती निकषांमध्ये काही बदल होणार नाही. पहिली कट ऑफ लिस्ट ७ ते १० सप्टेंबर दरम्यान जाहीर केली जाणार आहे. यावर्षी ९ च्या ऐवजी १३ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा होणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rGbcEn
via nmkadda

0 Response to "DU Admission 2021: दिल्ली विद्यापीठामध्ये पीजी, एमफिल आणि पीएचडी प्रवेशासाठी नोंदणी सुरु Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel