
HSC 2021: महाराष्ट्र बोर्डाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रतिक्षा आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डातर्फे होणाऱ्या बारावीच्या निकालाची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड येत्या काही दिवसात करु शकतात. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत अवधी दिला आहे. या अनुशंगाने १० वीचा रिझल्ट जाहीर झाला आहे. तसेच आता ३१ जुलैला अकरा दिवस शिल्लक असताना दरम्यान बारावीच्या निकालाची घोषणा देखील लवकरच होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. बारावी निकालाची वाट पाहणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in और mahresult.nic.in वर जाऊन लेटेस्ट अपडेट पाहू शकतात.तसेच विद्यार्थी रिझल्ट पाहण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करु शकता. Maharashtra 12th Result 2021: असा तपासा रिझल्ट बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in वर जा. यानंतर Maharashtra या लिंकवर क्लिक करा. यानंतर बारावीचा रोल नंबर टाकून सबमिट करा. यानंतर तुम्हाला बारावीचा निकाल २०२१ स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी प्रिंटआऊट काढून ठेवा. करोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीप्रमााणे बारावीची परीक्षा देखील रद्द करण्यात आली होती. त्यामुळे दहावीप्रमाणे बारावीचा निकाल देखील अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जाहीर होणार आहे. शाळांमधून हे गुण मंडळापर्यंत पोहोचणे आणि निकाल जाहीर करण्यापर्यंतीच्या प्रक्रियेत बराच वेळ जातो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर बारावीचा निकाल जाहीर केला जाईल. दहावीच्या निकालावेळेस पाच ते सहा तास शिक्षण मंडळाची वेबसाइट हॅंग झाली होती. यानंतर याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. आता बारावीचा निकाल लागताना असा गोंधळ पुन्हा होऊ नये अशी आशा विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3zeOciq
via nmkadda
0 टिप्पण्या