Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ८ जुलै, २०२१, जुलै ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-08T12:47:26Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

I-T Department Recruitment 2021: मुंबईत I-T डिपार्टमेंटमध्ये १५५ जागा रिक्त, इथे करा अर्ज Rojgar News

Advertisement
I-T Department Recruitment 2021: प्रधान मुख्य आयुक्त, आयकर विभाग, मुंबईतर्फे विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स( Inspector of Income Tax), टॅक्स असिस्टंट (Tax Assistant) आणि मल्टी टास्किंग स्टाफची (Multi-Tasking Staff) पदं भरली जाणार आहेत. ही भरती विशिष्ट खेळ किंवा क्रीडा विभागातील गुणवंत खेळाडूंसाठी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3hpug6e वर जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. २५ ऑगस्ट ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही भरती एकूण १५५ पदांसाठी असणार आहे. यातील ८ पदे ही इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स , ८३ पद टॅक्स असिस्टंट आणि ६४ मल्टी टास्किंग स्टाफ भरला जाणार आहे. आय-टी विभाग भरती २०२१: वयोमर्यादा आयकर निरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्षांदरम्यान असणे गरजेचे आहे. कर सहाय्यक पदासाठी उमेदवारांचे वय १८ ते २७ दरम्यान आवश्यक आहे. तर मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवार हे १८ ते २५ वयोगटातील असणे गरजेचे आहे. आय-टी विभाग भरती २०२१: शैक्षणिक पात्रता आयकर निरीक्षक पदासाठी (Inspector of Income Tax)उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी असणे गरजेचे आहे. कर सहायक पदासाठी (Tax Assistant)उमेदवारांकडे पदवी आणि डेटा एंन्ट्री स्पीड ताशी ८००० शब्द प्रति तास असणे गरजेचे आहे. मल्टी टास्किंग पदासाठी (Multi-Tasking Staff) उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ / बोर्डाकडून दहावी किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे नोटिफिकेशनमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे उमेदवारांना क्रीडा पात्रता तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आय-टी विभाग भरती २०२१: असा भरा अर्ज प्राप्तिकर विभाग मुंबईची अधिकृत वेबसाइट https://ift.tt/3ywBKu0 ला भेट द्या. मुख्यपृष्ठावरील 'Sports Quota recruitment 2021’ या लिंकवर जा सर्व आवश्यक तपशील भरा संबंधित क्रीडा प्राधिकरणाद्वारे योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरीकृत फॉर्म अपलोड करा भविष्यातील वापरासाठी प्रत काढून ठेवा फॉर्म १/२/३/४/५ वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील. नोटिफिकेशनमध्ये म्हटल्याप्राणे या फॉर्मच्या सुस्पष्ट स्कॅन कॉपी योग्यरित्या अपलोड करणे गरजेचे आहे. त्यावर संबंधित क्रीडा अधिकाऱ्यांची सही असणे गरजेचे आहे. यामध्ये काही गोंधळ झाल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2Va8ta3
via nmkadda