Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, २४ जुलै, २०२१, जुलै २४, २०२१ WIB
Last Updated 2021-07-24T06:43:25Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

वेबसाइट डाऊन झाली तर 'असा' पाहा ICSE निकाल Rojgar News

Advertisement
class 10th 12th result 2021: काऊन्सिल फॉर दि इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) चा इयत्ता दहावीचा म्हणजेच आयसीएसई (ICSE)आणि इयत्ता बारावीचा म्हणजेच आयएससी (ISC)चा निकाल शनिवारी २४ जुलै रोजी जाहीर होणार आहे. दोन्ही परीक्षांचे निकाल दुपारी ३ वाजल्यापासून आयसीएसई बोर्डाची वेबसाइट cisce.org वर उपलब्ध केले जातील. विद्यार्थी त्यांचा वैयक्तिक निकाल या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकतील. वेबसाइटव्यतिरिक्त तुमच्याकडे निकाल पाहण्यासाठी आणखी एक पर्याय आहे. हा पर्याय म्हणजे SMS. जर तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या भेडसावत असेल, किंवा जास्त ट्रॅफिकमुळे वेबसाइट उघडण्यात अडचणी येत असतील, तरीही तुम्ही चिंता करू नका. वेबसाइटवर न जाता देखील एसएमएस द्वारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा निकाल जाणून घेऊ शकता. एसएमएसद्वारे कसा पाहाल निकाल? - दहावीचा निकाल पाहण्यासाठी - आपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ICSE असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ - या क्रमांकावर पाठवा. - बारावीचा निकाल पाहण्यासाठी - आपल्या मोबाइलमध्ये मेसेजच्या इनबॉक्समध्ये जाऊन न्यू मेसेजमध्ये ISC असं लिहून त्यापुढे आपला सात अंकी युनिक आयडी टाइप करा. आता हा मेसेज -०९२४८०८२८८३ - या क्रमांकावर पाठवा. महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल पाहण्यासाठी यंदा एसएमएस सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे लाखो विद्यार्थी निकालासाठी वेबसाइटवर अवलंबून राहिले आणि वेबसाइट क्रॅश झाली होती. मात्र आयसीएसई बोर्डाच्या एसएमएस सेवेमुळे विद्यार्थ्यांना निकाल पाहताना अडचण येण्याची शक्यता कमी आहे. संकेतस्थळावर निकाल पाहण्यासाठी काय कराल? बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर www.cisce.org किंवा www.results.cisce.org येथे विद्यार्थ्यांना त्यांचा वैयक्तिक निकाल पाहता येणार आहे. - काउन्सिलच्या www.cisce.org किंवा www.results.cisce.org या संकेतस्थळावर जा. - होमपेजवर 'Results 2021' या लिंकवर क्लिक करा. - आता दहावी किंवा बारावी यापैकी पर्याय निवडा - आता विद्यार्थ्यांनी त्यांचा युनिक आयडी, इंडेक्स नंबर आणि कॅपचा आदी माहिती भरून लॉगइन करावे. - निकाल पाहण्याच्या आणि प्रिंट आऊट काढण्यासंदर्भातील सूचना वेब पेजवर दिलेल्या असतील.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eRo2KW
via nmkadda