TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

ICSI CSEET 2021: १० जुलैला होणाऱ्या परीक्षेच्या मॉक टेस्टसाठी 'इथे' क्लिक करा Rojgar News

CSEET 2021: इंस्टिट्यूट ऑफ सेक्रेटरी ऑफ इंडियाने ( Institute of Company Secretaries of India,ICSI) ६ जुलैला कंपनी सेक्रेटरी एक्झिक्यूटीव्ह प्रवेश परीक्षेसाठी (, CSEET 2021) मॉक टेस्टचे आयोजन केले आहे. जे परीक्षार्थीं CSEET 2021 मध्ये सहभागी होणार आहेत ते icsi.edu वर देऊ शकतात. आयसीएसआय CSEET 2021 प्रवेश परीक्षा १० जुलैला होणार आहे. महत्वाच्या तारखा आयसीएसआय CSEET 2021 मॉक टेस्ट ६ जुलै २०२१ आयसीएसआय CSEET 2021 परीक्षा १० जुलै २०२१ परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३० मिनिटं आधी लॉगिन करणे आवश्यक आहे. आज होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेळ, यूजर आयडी आणि पासवर्ड ईमेलद्वारे पाठवण्यात आला आहे. ज्या लॅपटॉपवरुन विद्यार्थी मॉक देणार आहेत तिथे सुरक्षित ब्राऊजरचा वापर करावा अशी सूचना करण्यात आली आहे. याआधीच संस्थेतर्फे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले होते. ICSI CSEET प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी CSEET नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाकावी लागेल. त्यानंतर थेट लिंकवर जावे लागेल. उमेदवार सीएसईईटी नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख वापरून आयसीएसआय सीएसईईटी प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. वैकल्पिकरित्या ते येथे दिलेल्या आयसीएसआय सीएसईईटी २०२१ परीक्षेच्या थेट लिंकवर क्लिक करू शकतात. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, ICSI चे प्रवेश पत्र पोस्टाच्या माध्यमातून पाठवले जात नाही. हे केवळ ऑनलाईन माध्यमातून जारी केले जाते. CSEET, कार्यकारी आणि व्यावसायिक परीक्षांसाठी ICSI प्रवेश पत्र २०२१ खाली दिलेल्या प्रकारे डाऊनलोड करा. सर्वात आधी पेजवर दिल्या गेलेल्या लिंकवर क्लिक करा. त्यावर सांगितल्या गेलेल्या स्टेप फॉलो केल्यानंतर एक नवी विंडो ओपन होईल. लॉगिन विंडोमध्ये नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका तपशील टाकल्यानंतर 'लॉगिन' बटणावर क्लिक करा. आता स्क्रीनवर दिसणारे प्रवेश पत्र डाउनलोड करा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hIPHhT
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या