IGNOU Admit Card 2021: इग्नूतर्फे जून टर्म अॅण्ड एक्झामसाठी प्रवेश पत्र जाहीर, असे करा डाऊनलोड Rojgar News

IGNOU Admit Card 2021: इग्नूतर्फे जून टर्म अॅण्ड एक्झामसाठी प्रवेश पत्र जाहीर, असे करा डाऊनलोड Rojgar News

Admit Card 2021: इग्नूने जून टीईई परीक्षेसाठी जाहीर केले आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने जून टर्म अॅण्ड परीक्षा. टीईईसाठी प्रवेश पत्र २०२१ हे अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाहीर केले आहे. जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन हॉल तिकिट डाऊनलोड करु शकतात. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. विद्यापीठाने जाहीर केलेल्या शेड्यूल्डनुसार परीक्षा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान होणार आहे. for June TEE: जून टीईई प्रवेश पत्र असे करा डाऊनलोड इग्नूची वेबसाइट ignou.ac.in वर जा प्रवेश पत्र जाहीर झाल्यानंतर पेजवर June 2021 TEE Hall ticket लिंक वर पाहता येईल. या लिंकवर क्किल केल्यानंतर नवे पेज उघडेल. इथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्म तारीख टाका प्रवेश पत्र स्क्रिनवर दिसेल प्रवेश पत्र डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घेऊन ठेवा परीक्षेसंदर्भातील महत्वाची माहिती प्रवेश पत्रावर मिळेल इग्नू जून टीईई २०२१ ही ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. परीक्षेची तारीख जवळ आली असताना हॉल तिकिट जाहीर झाले आहे. परीक्षेसंदर्भातील कोणत्याही महत्वाच्या बातमीसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवावे लागणार आहे. ही परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे. पहिले सत्र सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आणि दुसरे सत्र दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत होणार आहे. इग्नूने पीजी डिप्लोमा, डिप्लोमा, पीजी सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट प्रोग्राम्ससाठी पूर्ण वेळापत्रक (IGNOU June TEE 2021 date sheet) आपल्या वेबसाइटवर जाहीर केले आहे. नोंदणीची तारीख वाढली दरम्यान इग्नूने जुलै २०२१ प्रवेशासाठी(IGNOU July 2021 admission)नोंदणी आणि पुनरनोंदणीची अखेरची तारीख वाढवली आहे. विद्यार्थी ३१ जुलैपर्यंत नोंदणी करु शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3j2eLB5
via nmkadda

0 Response to "IGNOU Admit Card 2021: इग्नूतर्फे जून टर्म अॅण्ड एक्झामसाठी प्रवेश पत्र जाहीर, असे करा डाऊनलोड Rojgar News"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel