Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
मंगळवार, १३ जुलै, २०२१, जुलै १३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-13T10:47:12Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOU Date Sheet: जून २०२० टर्म एंड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर Rojgar News

Advertisement
IGNOU Date Sheet: इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने जून २०२० टर्म एंड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इग्नूची अधिकृत वेबसाईट ignou.ac.in वर जाहीर केले आहे. इग्नू टीईई २०२१ वेळापत्रकानुसार पदवी, पदव्युत्तर, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा (पीजीडी), डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट कोर्सेसची जून २०२१ मध्ये संपलेल्या सत्रासाठी परीक्षा होत आहे. ही परीक्षा ३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२१ पर्यंत असेल. इतर कोर्सेससोबत इग्नू जून टीईई २०२१ चे वेळापत्रक यूजी आणि पीजी कोर्सेसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आले आहे. करोनामुळे परीक्षा स्थगित इग्नूमार्फक जून २०२१ टर्म एंड परीक्षेचे आयोजन १५ जून २०२१ पासून केले जाणार होते. याआधी विद्यापीठाने ६ मे २०२१ ला नोटीस जाहीर करुन जून टीईई २०२१ स्थगित करण्याची घोषणा केली होती. यासोबतच इग्नूने परीक्षेच्या २१ दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्याची घोषणा केली होती. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर इग्नूने जून टीईई २०२१ वेळापत्रकासोबत परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे निर्देश जाहीर केले आहेत. या निर्देशांचे पालन करणे सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणार आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारत सरकारद्वारे जाहीर केल्या गेलेल्या सोशल डिस्टन्सिंग आणि इतर निर्देशांचे पालन होणे गरजेचे आहे. सर्व परीक्षाकेंद्रांवर COVID-19 संबंधित उपाययोजनांचे कडक पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर आपले सहकारी विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी यासाठी दिशानिर्देशांचे पालन करणे, सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छता राखण्यास सांगितले गेले आहे. देशभरात पसरलेल्या करोना महामारीची स्थिती पाहता काही विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेले परीक्षा केंद्र मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म त्यांनी उल्लेख केलेल्या जवळच्या परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36yMRa0
via nmkadda