Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
सोमवार, ५ जुलै, २०२१, जुलै ०५, २०२१ WIB
Last Updated 2021-07-05T13:47:35Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOU June TEE 2021: जून टर्म अॅण्ड एक्झामच्या तारखेची घोषणा, पाहा डिटेल्स Rojgar News

Advertisement
IGNOU : इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिव्हर्सिटी (IGNOU)ने जून टर्म एंड एक्झाम २०२१ (TEE 2021) ची तारीख जाहीर केली आहे. यासंदर्भात इग्नूने आपल्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर केले आहे. यानुसार जून टर्म अॅण्ड परीक्षा २०२१ चे आयोजन ३ ऑगस्ट रोजी होणार आहे. परीक्षा परीक्षा यूजी, पीजी, सर्टिफिकेट्स, डिप्लोमा आणि युनिव्हर्सिटीद्वारे होणाऱ्या इतर कार्यक्रमाांसाठी आयोजित केली जाते. परीक्षेसाठी तारखांची यादी आणि इतर डिटेल्स लवकरच जाहीर केले जाणार आहेत. इग्नूची टर्म एंड परीक्षा जून २०२१ अंतिम वर्षाच्या यूजी, पीजी कार्यक्रमांसाठी त्यांच्या बॅकलॉकसहीत ३ ऑगस्टला आयोजित केली जाणार असल्याची सूचना विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिली आहे. तर पीजी, डिप्लोमा, पीजी सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट कोर्सची परीक्षा देखील ३ ऑगस्टपासून होणार आहे. विद्यार्थी इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in ला भेट देऊन नोटिफिकेशन तपासू शकता. नव्या अपडेटसाठी विद्यार्थ्यांना वेबसाइट पाहावी लागणार आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व सूचना वेबसाइटच्या माध्यमातून मिळणार आहे. बातमीखाली अधिकृत वेबसाइटची लिंक देण्यात आली आहे. इग्नूने नुकतीच जून टीईईसाठी परीक्षा फॉर्म अर्ज भरण्याची ९ जुलैपर्यंत वाढवली आहे. तर जून २०२१ सत्रासाठी फायनल प्रोजेक्ट, इंटरनशीप प्रोजेक्ट, शोध निंबध आणि फिल्ड वर्क जर्नल्स जमा करण्याची शेवटची तारीख १५ जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. याशिवाय जुलै २०२१ सत्रासाठी री-रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. उमेदवार आता १५ जुलैपर्यंत री-रजिस्ट्रेशन करु शकतात. याआधी री-रजिस्ट्रेशन करण्याची तारीख ३० जून २०२१ होती. उमेदवार आता १५ जुलैपर्यंत इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जाऊन री रजिस्ट्रेशन करु शकतात. प्रवेश घ्यायचाय ? इग्नूमध्ये प्रवेश घ्यायचाय अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रोग्राम्स कोर्सेसचे पर्याय आहेत. डिफरंट ओपन, डिस्टन्स लर्निंग (ODL) आणि ऑनलाईन प्रोग्रामिंग कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट www.oumarad.edu.in वर जायला हवे. June TEE 2021: कसा करायचा अर्ज? स्टेप १- सर्वात आधी IGNOU ची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जा. स्टेप २- "Online submission of exam form June 2021 Term End Examination date extended up to June 30, 2021." लिंकवर क्लिक करा. स्टेप ३- विचारलेली माहिती भरा. स्टेप ४- परीक्षा शुल्क भरा. स्टेप ५- आता अर्ज सबमिट करा. पहिल्यांदाच प्रवेश घेणाऱ्यांसाठी जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर अधिकृत वेबसाइटच्या होमपेजवर असलेल्या टॅबवर क्लिक करा. ज्या कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते निवडा. पात्रता निकष, शुल्काचा तपशील, कोर्सच्या अवधी हा सर्व तपशील वाचा. याव्यतिरिक्त, इग्नू कॉमन प्रॉस्पेक्टस आणि विद्यापीठातील नियम (कलम १०) वाचा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jKD9co
via nmkadda