Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ७ जुलै, २०२१, जुलै ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-07T14:47:21Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOUतून ड्रॉइंग आणि पेंटिंगमध्ये करा MA,सविस्तर जाणून घ्या Rojgar News

Advertisement
launches : स्कूल ऑफ परफॉर्मिंग अॅण्ड व्हिज्युअल आर्ट्स (SOPVA), इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठने मास्टर ऑफ आर्ट्स इन ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग्स (MADP)अभ्यासक्रम सुरु केला आहे. जुलै २०२१ पासून हा अभ्यासक्रम सुरु होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे पारंपारिक प्रणालीच्या माध्यमातून ललित कलेचा अभ्यास पोहोचला नाही त्यांना शिक्षण देणे हा या अभ्यासक्रमाचा उद्देश असल्याचे विद्यापीठाने सांगितले. हा अभ्यासक्रम उच्च शिक्षण घेणाऱ्या ललित कला विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केला गेलाय आणि यामध्ये कलेचे तत्व आणि सिद्धांत, कलेचा इतिहास, कला, शिक्षण, सौंदर्यशास्त्र सिद्धांतासारख्या मुख्य घटकांचा समावेश आहे. नियोजित, स्वनियोजित, फ्रीलान्सर, डिझायनर, चित्रकार, शाळा आणि कॉलेजचे शिक्षकांना या अभ्यासक्रमाचा फायदा होणार असल्याचेही विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. इग्नूच्या वेबसाइटवर यासंदर्भातील अधिक माहिती देण्यात आली आहे. याची लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. कलेमध्ये पदवीचे शिक्षण घेण्यासोबतच विद्यार्थी , ललिक कला, दृश्य कला, अॅनिमेशन, डिझाइन, फॅशन, औद्योगिक, कपडा या संबंधित विषयात पदवी मिळवता येऊ शकते. यासाठी विद्यार्थी अर्ज करु शकतात. अभ्यासक्रमाची भाषा मास्टर ऑफ आर्ट्स इन ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग्स या अभ्यासक्रमाचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून असणार आहे. असे असले तरी विद्यार्थ्यांना हिंदीमध्ये आपली असाइनमेंट आणि परीक्षा पूर्ण करण्याची परवानगी असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. अभ्यासक्रमाचा कालावधी मास्टर ऑफ आर्ट्स इन ड्रॉइंग अॅण्ड पेंटिंग्स या अभ्यासक्रमाचा कालावधी दोन वर्षांचा असणार आहे. याचे शुल्क १६,५०० रुपये आहे. विद्यार्थ्यांना ही रक्कम दोन टप्प्यात भरावी लागणार आहे. विद्यार्थी दोन वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिवर्ष ८,२५० रुपये भरु शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3yBelb1
via nmkadda