Advertisement
Post Graduate Course: इंदिरा गांधी नॅशनल युनिव्हर्सिटी(Indira Gandhi National Open University) दोन पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यामध्ये मास्टर ऑफ सायन्स (इंफॉर्मेशन सिक्योरिटी) आणि मास्टर ऑफ आर्ट्स (उद्योजकता) या कार्सचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्रांद्वारे घोषित केलेल्या ‘जागतिक युवा कौशल्य दिनाच्या’ निमित्ताने स्कूल ऑफ वोकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगतर्फे दोन पीजी प्रोग्राम सुरु करण्यात आले. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक असलेले विद्यार्थी ३१ जुलैपर्यंत इग्नूची अधिकृत वेबसाईट ignouadmission.samarth.edu.in वर या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकतात. इग्नूचे कुलगुरु प्रोफेसर नागेश्वर राव यांनी हे पीजी कार्यक्रम सुरु केले आहेत. करोनाच्या पार्श्वभुमीवर या कोर्सचा वर्चुअल उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये बाहेरील विशेषज्ञ, यूएनवीचे देश व्यवस्थापक अरुण सहदेव सहभागी होते. दिल्ली विद्यापीठाच्या अर्थ अध्ययन विभागाचे डीन प्रोफेसर संजय सहगल, उद्योजकता विशेषज्ञ डॉ.जे एस जुनेजा आणि सुरक्षा विशेषज्ञ प्रोफेसर सुशीला मदान हे सहभागी होते. इग्नूने दिलेल्या अधिकृत स्टेटमेंटनुसार, एमए उद्यमिता कार्यक्रमाचा हेतू हा स्वत:चा व्यवसाय सुरु करण्यासाठी ज्ञान, कौशल्य आणि दक्षता प्रदान करण्याचा आहे. यशस्वी उद्योगाचे लक्ष्य गाठण्यासाठी स्टार्टअप, नाविण्य, सॉफ्ट स्किल्स अशा विविध पैलूंचा अभ्यास होणे गरजेचे आहे. जून टर्म एंड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) ने जून २०२० टर्म एंड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. इग्नूची अधिकृत वेबसाईट ignou.ac.in वर जाहीर केले आहे. इग्नू टीईई २०२१ वेळापत्रकानुसार पदवी, पदव्युत्तर, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा (पीजीडी), डिप्लोमा, पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट आणि सर्टिफिकेट कोर्सेसची जून २०२१ मध्ये संपलेल्या सत्रासाठी परीक्षा होत आहे. ही परीक्षा ३ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर २०२१ पर्यंत असेल. इतर कोर्सेससोबत इग्नू जून टीईई २०२१ चे वेळापत्रक यूजी आणि पीजी कोर्सेसच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांसाठी जाहीर करण्यात आले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xMmM2V
via nmkadda