Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २३ जुलै, २०२१, जुलै २३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-23T14:43:50Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IGNOU तून डिजिटल मीडियामध्ये पीजी डिप्लोमा करा, जाणून घ्या डिटेल्स Rojgar News

Advertisement
New Courses 2021: इग्नू स्कूल ऑफ जर्नलिझम अॅण्ड न्यू मीडिया स्टडीज (SOJNMS)ने ओपन अॅण्ड डिस्टन्स माध्यमातून डिजिटल मीडियामध्ये पीजी डिप्लोमा (PGDIDM) अभ्यासक्रम आणला आहे. याचे उद्घाटन २३ जुलैला व्हर्चुअल माध्यमातून करण्यात आले. यामध्ये मीडिया व्यवसायातील प्रमुख व्यक्तींनी सहभाग घेतला होता. देशभरात वाढणाऱ्या मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात डिजिटल मीडीयाचा विकास आणि तंत्रज्ञानामध्ये गेल्या काहीवर्षात झालेल्या बदलावर यावेळी चर्चा करण्यात आली. आजच्या युगातील डिजिटल माध्यमांच्या भूमिकेवर इग्नूचे कुलगुरु प्रा. नागेश्वर राव यांनी प्रकाश टाकला. या अभ्यासक्रमामुळे नव्या शैक्षणिक धोरणानुसार रोजगार मिळेल. डिजिटल मीडियामध्ये पीजी डिप्लोमाचा उद्देश हा मीडिया प्लॅटफॉर्मच्या तीन विशिष्ट डोमेनवर विद्यार्थ्यांना सुविधा देण्याचा आहे. ज्यामध्ये मीडियाचा वैचारीक ढाचा, ऑनलाइन आणि डिजिटल जर्नलिझम प्रॅक्टीस, बिग डेटा अॅनालिटीक्स आणि डेटा मायनिंगसहीत इंटरनेट टेक्निकचा सहभाग असेल. डिजिटल मिडियामध्ये पीजी डिप्लोमा हा एक वर्षाचा अभ्यासक्रम असेल. यासाठी कोणत्याही शाखेतून पदवी असणारा उमेदवार अर्ज करु शकतो. डिजिटल मीडियामध्ये पीजी डिप्लोमा करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in वर जाऊन अर्ज करु शकतात. असा करा अर्ज इग्नूची अधिकृत वेबसाइट ignouadmission.samarth.edu.in जा. होमपेजवर 'NEW REGISTRATION'या लिंकवर क्लिक करा. नवे पेज खुले होईल. इथे मागितलेली डिटेल्स भरुन स्वत:ला रजिस्टर करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. उमेदवाराचे युझरनेम रजिस्टर्ड ई-मेल आयडी येईल. त्याच्या मदतीने लॉग इन करा. या डॉक्युमेंट्सची आवश्यकता स्कॅन केलेले पासपोर्ट साइझ फोटो (१०० केबी) स्कॅन केलेली सही (१०० केबी) वय प्रमाणित स्कॅन प्रति (२०० केबी) संबंधित एजुकेशन क्वालिफिकेशन डॉक्यूमेंट्सची स्कॅन कॉपी (२०० केबी) अनुभव प्रमाणपत्र स्कॅन करुन जात वैधता प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (लागू होत असल्यास) बीपीएल प्रमाणपत्राची स्कॅन कॉपी (२०० केबी) असणे गरजेचे आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3eQHS91
via nmkadda