Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २३ जुलै, २०२१, जुलै २३, २०२१ WIB
Last Updated 2021-07-23T10:43:37Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

IITs आणि IISc तर्फे नवे अभ्यासक्रम सुरु, २ ऑगस्टपर्यंत करा अर्ज Rojgar News

Advertisement
and offer new Course: (IITs) आणि ( IISc) यांनी एकत्र येऊन नवे सुरु केले आहेत. याअंतर्गत संस्थेने नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नोलॉजी इनहेंस्ड लर्निंग (National Programme on Technology Enhanced Learning) अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रिक व्हिकल्स (Electric vehicles) आणि डिझाइन फॉर IoT (Design for IoT), बिझनेस अॅण्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट (business and sustainable development) अभ्यासक्रमाची सुरुवात केली आहे. या अभ्यासक्रमासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. जुलै-डिसेंबर २०२१ सेमिस्टरसाठी प्रवेश प्रक्रिया आधीच सुरु झाली आहे. NPTEL अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रवेश मिळविण्यासाठी २ ऑगस्टपर्यंत अर्ज करु शकता. हा अभ्यासक्रम आयआयटी आणि आयआयएससीच्या विशिष्ट विभागाद्वारे शिकवला जाणार आहे. या अभ्यासक्रमासाठी इच्छुक विद्यार्थी आणि विद्यार्थीनी एनपीटीईएल अभ्यासक्रमासाठी अधिकृत वेबसाइट swayam.gov.in/NPTEL च्या माध्यमातून नोंदणी करु शकता. या संस्थातील विद्यार्थी आणि विशिष्ट विभाग विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढविण्यासाठी एनपीटीईएल अभ्यासक्रम चालवतात असे या संदर्भात आयआयटी मद्रासच्या एनपीटीईएल समन्वयक विग्नेश मुथुविजयन यांनी म्हटले. एनपीटीईएल प्लॅटफॉर्मवर काही लोकप्रिय अभ्यासक्रमांमध्ये इंजिनीअरिंगसाठी डेटा सायन्स, पायथनमध्ये प्रोग्रामिंगवर अभ्यासक्रम, सी.सी ++, सॉफ्ट स्किल्स, प्रोजेक्ट लर्निंगसहित अन्य कोर्सेसचा सहभाग असल्याचे ते म्हणाले. आयआयटी मद्रासच्या मीडिया रिपोर्टनुसार, एनपीटीएलला आतापर्यंत १.४ कोटींहून अधिक नामाकंन मिळाली आहेत. तर एनपीटीईएल व्हिडीओ युट्यूबवर आतापर्यंत एक अरबहून अधिकवेळा पाहीला गेला आहे. यूट्यूबवर एनपीटीईएल चॅनलला ३.१ मिलियनहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत. तर महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले हायस्कूलमध्ये १५ वर्षांचा हर्षवर्धन पाटील हा सर्वात कमी वयाच्या एनपीटीईएल विद्यार्थी आहेत. त्याने एनपीटीईएलच्या माध्यमातून ५ प्रमाणित अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. याअंतर्गत त्याने इफेक्टीव्ह लर्निंग, सॉफ्ट स्किल्स डेव्हलमेंट, स्ट्रेस मॅनजमेंट, बायोकेमिस्ट्री आणि स्पर्धा परीक्षेसाठी इंग्रजी भाषा कोर्स शिकला आहे. एनपीटीईएल अभ्यासक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी यासंदर्भातील अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यावर कोर्स संदर्भातील पूर्ण माहिती मिळू शकेल असे आयआयटी मद्रासच्या अहवालात म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kLohej
via nmkadda