
MR : भारतीय नौदलाच्या मॅट्रिक रिक्रूट (एमआर) परीक्षेती तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय नौदलात ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरु होणाऱ्या मॅट्रीक रिक्रूट भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. इंडियन नेव्ही एमआर रिक्रूटमेंट २०२१ च्या नोटिफिकेशननुसार सेलर एमआरच्या एकूण ३५० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत. या रिक्त जागांची संख्या राज्यानुसार ठरवण्यात आली आहे. एकूण ३५० रिक्त जागांसाठी १७५० उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीसाठी आमंत्रित केले जाणार आहे. प्रत्येक राज्यानुसार कटऑफ यादी वेगळी असणार आहे. सेलर मॅट्रीक रिक्रूट पदांवरील भरतीसाठी इंडियन नेव्ही एमआर नोटिफिकेशन २०२१ जाहीर करण्यात आले आहे. यानुसार भारत सरकारच्या शिक्षण विभागातील मान्यताप्राप्त शिक्षण बोर्डातून दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवाराचा जन्म १ एप्रिल २००१ च्या आधी आणि ३० सप्टेंबर २००४ च्या नंतरचा नसावा अशी अट आहे. निवड प्रक्रिया इंडियन नेव्हीमध्ये सेलर मॅट्रीक रिक्रूट पदांवरील उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर एकूण ३५० साठी केवळ १७५० उमेदवारांना परीक्षा आणि पीएफटीसाठी आमंत्रित केले जाणार आहे. या उमेदवारांची निवड दहावीच्या गुणांवर केली जाणार आहे. असा करा अर्ज इंडियन नेव्हीमध्ये सेलर मॅट्रिक रिक्रूट्ससाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in वर अॅक्टीव्ह केल्या जाणाऱ्या ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करु शकतात. अर्जाची विंडो १९ ते २३ जुलैदरम्यान खुली राहणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3AvIURb
via nmkadda
0 टिप्पण्या