TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

IPMAT: पावसामुळे हुकली मुंबईतल्या विद्यार्थ्यांची IIM परीक्षा Rojgar News

IIM Exam missed in Mumbai: मुंबईत दिवसभर पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका IIM ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला आहे. पावसामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे हे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचले नाहीत, परिणामी त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. सुमारे १०० विद्यार्थ्यांची परीक्षा त्यामुळे हुकली आहे. मुंबईत पवई येथील परीक्षेचे केंद्र होते. पाच वर्षीय इंटिग्रेटेड मॅनेजमेंट अभ्यासाच्या या परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी यंदा आयआयएम इंदूर (IIM Indore)कडे आहे. परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांनी या प्रकाराला त्यांच्या सोशल मिडीया हँडलद्वारे वाचा फोडली. प्रशांत पंड्या नावाच्या विद्यार्थ्याने लिहिलंय, 'आम्हाला ही प्रवेश परीक्षा देता आली नाही. मुंबईत सर्वत्र पाऊस होता, रस्ते ब्लॉक होते. आम्ही परीक्षेच्या वेळेआधी पोहोचलो होतो, तरी आम्हाला परीक्षेला बसू दिले नाही. आम्हाला परीक्षेसाठी आणखी एक संधी हवी आहे. आयआयएमने याची दखल घ्यावी.' अन्य एका पालकाने आयआयएम इंदूरचे संचालक हिमांशु राय यांना टॅग करत पोस्ट केली आहे. आयआयएम इंदूरने या पोस्टपैकी कोणालाही प्रतिसाद दिला नाही.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3BdvFon
via nmkadda

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या