Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ७ जुलै, २०२१, जुलै ०७, २०२१ WIB
Last Updated 2021-07-07T05:47:19Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Main 2021 Exam Dates: तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षांच्या तारखांची घोषणा Rojgar News

Advertisement
2021 Exam Dates: मेन्स परीक्षेच्या तारखांची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal)यांनी इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षा जॉइंट एंन्ट्रंस एक्झाम मेन (JEE Main 2021)च्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे. एप्रिल २०२१ मध्ये होणारी जेईई मेन्स परीक्षा २० ते २५ जुलैदरम्यान होणार आहे. शिक्षणमंत्र्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षेच्या वेळापत्रकाची माहिती देताना म्हटले की, ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या टप्प्या (एप्रिल२०२१) साठी अर्ज केला नव्हता ते आता अर्ज करु शकतात. जेईई मेन२०२१ तिसऱ्या सत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ६ जुलै ते ८ जुलै रात्री ११ वाजेपर्यंत विंडो खुली असणार आहे. जेईई मेन(मे)२०२१ परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये जेईई मेन२०२१ च्या चौथ्या टप्प्याची परीक्षा मे २०२१ मध्ये होणार होती. ही परीक्षा आता २७ जुलैपासून २ ऑगस्टदरम्यान होणार आहे. ज्या उमेदवारांनी चौथ्या आणि शेवटच्या सत्रासाठी अर्ज केले नव्हते ते आता ९ ते १२ जुलैपर्यंत नोंदणी करु शकतात. जेईई मेन २०२१ ची नोंदणी पुन्हा सुरु जे उमेदवार पहिल्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करु शकले नाहीत त्यांना अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे. त्या उमेदवारांसाठी नोंदणी विंडो पुन्हा खुली करण्यात आली आहे. जे उमेदवार एप्रिल सत्रासाठी अर्ज करु इच्छित आहेत त्यांच्यासाठी ६ ते ८ जुलैपर्यंत विंडो खुली राहणार असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री म्हणाले. जेईई मेन२०२१ साठी परीक्षा केंद्रांत वाढ करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि एसओपीचे पालन करण्यासाठी एनटीएने जेईई मेन (एप्रिल आणि मे) सत्रासाठी परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ केली आहे. याआधी ६६० परीक्षा केंद्र होती. आता ही संख्या वाढवून ८२८ करण्यात आली आहे. शिक्षणमंत्र्यांची माहिती शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी ६ जुलै २०२१ ला अधिकृत ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार संध्याकाळी ७ नंतर जेईई मेन्सच्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रासंबंधित माहिती जाहीर केली जाणार होती. 'प्रिय विद्यार्थ्यांनो तुम्ही ज्याची वाट पाहत आहात, मी आज संध्याकाळी ७ वाजता #JEE च्या तिसऱ्या आणि चौथ्या सत्रातील परीक्षांची माहिती देणार आहे,' असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले होते. ६ लाखांहून अधिक नोंदणी एनटीएनने दिलेल्या माहितीनुसार, एकूण ६ लाखांहून अधिक उमेदवारांनी जेईई मेन एप्रिल २०२१ साठी नोंदणी केली आहे. नोंदणी रि-ओपन केल्याने उमेदवारांची संख्या वाढणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3qT6rqU
via nmkadda