Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, ८ जुलै, २०२१, जुलै ०८, २०२१ WIB
Last Updated 2021-07-08T09:47:28Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JEE Main Exam 2021: तिसऱ्या सत्रासाठी नोंदणी करण्याची अखेरची संधी, जाणून घ्या Rojgar News

Advertisement
Exam 2021: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA)तर्फे जेईई मेन्स परीक्षा २०२१ च्या तिसऱ्या सत्रासाठी नोंदणी प्रक्रिया ८ जुलैला बंद होणार आहे. ज्या उमेदवारांनी अद्याप कम्बाइंड प्रवेश परीक्षेसाठी अर्ज केला नसेल त्यांनी NTA JEE च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ८ जुलै रात्री ११.५० वाजेपर्यंत आहे. ही परीक्षा २० जुलै ते २५ जुलै दरम्यान होणार आहे. प्रवेश पत्रासंदर्भातील घोषणा लवकरच केली जाणार आहे. जेईई मेन(मे)२०२१ परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये जेईई मेन२०२१ च्या चौथ्या टप्प्याची परीक्षा मे २०२१ मध्ये होणार होती. ही परीक्षा आता २७ जुलैपासून २ ऑगस्टदरम्यान होणार आहे. ज्या उमेदवारांनी चौथ्या आणि शेवटच्या सत्रासाठी अर्ज केले नव्हते ते आता ९ ते १२ जुलैपर्यंत नोंदणी करु शकतात. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग आणि एसओपीचे पालन करण्यासाठी एनटीएने जेईई मेन (एप्रिल आणि मे) सत्रासाठी परीक्षा केंद्रांच्या संख्येत वाढ केली आहे. याआधी ६६० परीक्षा केंद्र होती. आता ही संख्या वाढवून ८२८ करण्यात आली आहे असा करा ऑनलाइन अर्ज सर्वात आधी JEE च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा होमपेजवर असलेल्या लिंकवर क्लिक करा एक नवे पेज खुले होईल. इथे उमेदवारांना नोंदणीसंदर्भात माहिती भरावी लागेल. अर्ज आणि अर्ज शुल्क भरा अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पेज डाऊनलोड करा भविष्यातील उपयोगासाठी प्रत स्वत:कडे ठेवा वेळेच्या अभावी करेक्शन विंडो खुली नसेल. त्यामुळे उमेदवारांना अर्ज काळजीपूर्वक भरावा लागेल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3hnT9PS
via nmkadda