Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, ९ जुलै, २०२१, जुलै ०९, २०२१ WIB
Last Updated 2021-07-09T12:47:10Z
मराठी Career बातम्या | Maharashtra Times C2KCareer News in Marathi: Career NewsIFTTTjobmarathimajhinaukrimajhinewsnmkadda

JIPMAT 2021: अर्जातील दुरुस्तीसाठी विंडो ओपन Rojgar News

Advertisement
JIPMAT 2021: जॉइंट इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंटचे (Joint Integrated Programme in Management Admission Test, ) अॅप्लिकेशन फॉर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी करेक्शन विंडो उघडण्यात आली आहे. जे विद्यार्थी अर्जात कोणताही बदल करू इच्छित असतील ते, ऑनलाइन पद्धतीने अर्जात दुरुस्ती करू शकतात. उमेदवारांना दुरुस्तीसाठी अधिकृत वेबसाइट jipmat.nta.ac.in वर जाऊन लॉगइन करावे लागेल. परीक्षा आयोजित करणारी नॅशनल टेस्टिंग एजेंसी एनटीए १२ जुलै रोजी ही दुरुस्ती विंडो बंद करणार आहे. एनटीएने जारी केलेल्या निवेदनानुसार, 'JIPMAT परीक्षा अर्जातील दुरुस्तीसाठी सर्व नोंदणीकृत उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. उमदेवारांनी अत्यंत काळजीपूर्वक सुधारणा करावी. अखेरची मुदत संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करण्याची संधी दिली जाणार नाही.' NTA : जॉइंट इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट अर्जात कशी कराल दुरुस्ती? जॉइंट इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट अॅप्लिकेशन फाॅर्म मध्ये दुरुस्ती करण्यासाठी सर्वात आधी अधिकृत वेबसाइट jipmat.nta.ac.in वर जा. यानंतर दिलेल्या लिंक वर - JIPMAT 2021 एडिट करेक्शन विंडो - वर क्लिक करा. यानंतर जिपमॅन अर्ज क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉगइन करा. यानंतर JIPMAT 2021 अर्जात आवश्यक ती दुरुस्ती / सुधारणा करा आणि सबमिट करा. यानंतर भविष्यातील संदर्भासाठी अर्जाचे प्रिंटआऊट घेऊन ठेवा. NTA ने JIPMAT अॅप्लिकेशन 2021 विसरणाऱ्या उमेदवारांना एक पर्याय दिला आहे. जिपमॅट २०२१ अर्ज क्रमांक पुन्हा मिळवण्यासाठी उमेदवारांना आपला रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक किंवा ईमेल आयडी 'फरगॉट अॅप्लिकेशन नंबर' विंडो वर द्यावा लागेल. यानंतर तुमचा अॅप्लिकेशन क्रमांक तुम्हाला दिसेल. जॉइंट इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट परीक्षेच्या माध्यमातून आयआयएम बोधगया आणि आयआयएम जम्मू मधील मॅनेजमेंटच्या पाच वर्षीय इंटीग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी परीक्षा होते. परीक्षेशी संबंधित माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला नियमितपणे भेट देत राहावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/36oGs0P
via nmkadda